पुणे : पुणे महानगरपालिकेने एक पुरोगामी पाउल उचले आहे. समाजातील सर्वच वर्गाना नागरिक कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी. या उद्देशाने तृतीयपंथी यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपाच्या मिळकतीचे संरक्षण प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथी, तीच्या प्रस्तावावर पालिका आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) कुणाल खेमनार यांनी, २५ तृतीयपंथी व्यक्तींना तातडीने ठेकेदारामार्फत कामावर रुजू करण्यात मान्यता दिली आहे. उर्वरितीतांना टप्याटप्याने कामावर येण्यास मान्यता दिली आहे.
तृतीयपंथी यांची केली नेमणूक: पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करताना तृतीयपंथी यांना नेमणूक दिली जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रा. लि. व गल सेक्युरिटी प्रा. लि. या खाजगी कंपनीकडून यांना वेतन तसेच सरकारी देय हे दिली जाणार आहेत.
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणार : या कामाचा प्रस्ताव माधव जगताप उपआयुक्त सुरक्षा विभाग यांनी तयार करून सादर केला होता. तसेच यासाठी शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांची कमिटी तयार करून, मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सामाजिक सलोखा आणि सामाजिक स्नेहासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. तसेच भविष्यात तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे.
काय आहे तृतीयपंथांच्या अडचणी : शरीराने स्त्रियांसारख्या दिसत असल्या तरी त्या सर्वसामान्य स्त्रीसारख्या विवाह करू शकत नाही. तर पुरुषा सारखे मेहनत करू शकत नाही. टाळ्या वाजवून पैसे मागने आणि त्या बदल्यात आशीर्वाद दिला जातो. त्यांना समाजाकडून हिणवले जाते. घालून टाकून बोलल्या जाते आणि काही वेळेस झिडकारल्याही जाते. परंतु आता त्यामध्येही काही तृतीयपंथी प्रशासकीय सेवेत आपले कर्तुत्व सिध्द करतांना दिसत आहे. तर पोलीस भरतीमध्ये सुद्धा अशा तृतीयपंथासाठी काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.