ETV Bharat / state

Girish Bapat Leave Meeting : 40 वर्षात पहिल्यांदाच कालवा समितीच्या बैठकीत सभात्याग; पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर आंदोलन - खासदार गिरीश बापट - अजित पवार कालवा समिती बैठक पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांच्या अध्यक्षतेखाली नीरा उजवा/डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड प्रकल्प उन्हाळी हंगाम सन २०२२ कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ( Kalva Samiti Meeting Pune ) या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला.

pune mp girish bapat
खासदार गिरीश बापट
author img

By

Published : Mar 26, 2022, 5:46 PM IST

Updated : Mar 26, 2022, 7:12 PM IST

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांच्या अध्यक्षतेखाली नीरा उजवा/डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड प्रकल्प उन्हाळी हंगाम सन २०२२ कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ( Kalva Samiti Meeting Pune ) या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला. येत्या 2 ते 3 दिवसात जर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन करू, असा इशारा यावेळी खासदार गिरीश बापट यांनी दिला. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,खासदार गिरीश बापट तसेच अधिकारी उपस्थित होते.

याबाबत बोलताना खासदार गिरीश बापट

बापट यांची टीका - उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. पण शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये असमान पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. गरिबाला वेगळा न्याय आणि श्रीमंताला वेगळा न्याय दिला जात आहे, अशी टीका यावेळी बापट यांनी केली.

हेही वाचा - Kirit Somaiya : किरीट सोमय्या दापोलीत दाखल.. राष्ट्रवादी - शिवसेनेकडून काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी

मी उद्या पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निवासस्थानी पाणी किती दाबाने येत आहे हे चेक करणार आहे, असेदेखील यावेळी बापट म्हणाले. यंदा खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात १५.३८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. या १५. ३८ टीएमसची पाण्याचे जून अखेरपर्यंतचे नियोजन केले जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. पुणे शहराचे पाणी, शेतीचे आवर्तन व उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन याचा विचार करून पाण्याचे नियोजन ठरण्याची देखील शक्यता आहे.

Last Updated : Mar 26, 2022, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.