ETV Bharat / state

Pune Metro : पुणे मेट्रोचे काम 'या' महिन्यात पूर्ण होणार; सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानका दरम्यान पार पडली चाचणी

author img

By

Published : Mar 27, 2023, 8:57 PM IST

पुणे मेट्रोचा संपूर्ण काम पुढच्या महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. मेट्रोची सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक, अशी पहिली ट्रायल रन पूर्ण करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे.

Pune Metro
पुणे मेट्रो

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित माहिती देताना

पुणे : पुणे मेट्रोकडून कामाला गती मिळाली आहे. शहरातील प्रत्येक रेल्वे स्थानकाच एक वेगळे महत्त्व असून ते लवकरच पूर्ण करण्याचे काम हे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर मेट्रोच गरवारे ते वनाझ स्थानक आणि फुगेवाडी ते पिंपरी अशी मेट्रो सुरू आहे. दरम्यान, आज पुणे मेट्रो कडून मेट्रोची सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक अशी पहिली ट्रायल रन पूर्ण करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात होणार काम पूर्ण : पुण्यातील गरवारे ते रुबी हॉल आणि फुगे वाडी ते सिव्हिल कोर्ट अशा 16 किलोमीटर मार्गावरचे काम हे लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच शहरातील संपूर्ण मेट्रोचे काम हे देखील प्रगतीपथावर होत असून लवकरच हे पूर्ण होणार आहे. संपूर्ण मेट्रोचे काम हे पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले. आज पहिली ट्रायल रन झाल्यानंतर डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

लवकरच मार्ग सुरू होणार : पुणे मेट्रो अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेज स्थानक हे मार्ग 2022 मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक - सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक - रुबी हॉल स्थानक या मार्गिका लवकरच प्रवाशासाठी सुरू करण्यात येणार आहे.

काय म्हणाले दिक्षित ? : गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर चाचणी देखील घेण्यात आली होती. आणि आत्ता आज सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक- मंगळवार पेठ(RTO) - पुणे रेल्वे स्थानक - रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली आहे. या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. काही कामे हे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी एम आर एस निरीक्षण करण्यात येणार आहे. आणि लवकरच सी एम आर एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल, अशी माहिती डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी दिली आहे.

प्रवाशांना मिळणार लाभ : सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गिकेवर मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. या मार्गात आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक रुबी हॉल जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज हे स्थानके जोडली जाणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात ये-जा करने सोयीचे होणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्याने रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. आणि हे देखील महत्त्वाचे आहे.

सरकारच्या परवानगीनंतर मेट्रो सुरू होणार : पुण्यातील मेट्रो येथील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकांची कामे हे जवळपास पूर्ण होत आले आहेत. या मार्गावर लवकरच येत्या महिन्या किंवा दोन महिन्यात प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील संपूर्ण मेट्रोच काम हे देखील जलद गतीने सुरू असून पुढील महिन्यात ते पूर्ण होणार आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीनंतर ते लवकरच सुरू देखील होणार आहे, असे देखील यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Imaginary City Museum : पुण्यात आहे चक्क 'काल्पनिक शहर'; पाहिलं नसेल तर हा रिपोर्ट नक्की पाहा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.