पुणे : तुम्ही जर पुणे मेट्रोने प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर तिकीट रांगेमध्ये थांबायचे नसेल तर आता मेट्रो कडून तुम्हाला तुमच्या व्हाट्सअपवर किंवा कोड पाठवून तिकीट मिळणार आहे. मेट्रो कडून 9420101990 या क्रमांकावर व्हाट्सअप केल्यावर प्रवाशाच्या मोबाईलवरच क्यूआर ( pune metro provide e-ticket ) कोड येईल आणि त्यातून तुम्हाला तिकीट मिळणार आहे.
असी असेल सुविधा - ई-तिकीट हे प्रवाशांना दोन पद्धतीने काढता येईल. पहिली पद्धत म्हणजे कीऑस्क मशीनच्या साह्याने प्रवासी स्वतः हे तिकीट काढू शकतात. दुसरी पद्धत म्हणजे स्थानकात जाऊन टॉम ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्याला हे तिकीट मिळवता येईल. हे सुविधा मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तिकीट पेपरलेस असल्याने हे पर्यावरण पूरक आहे. त्यामुळे रांगेत थांबण्याची आवश्यकता भासणार नाही, असे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बीजेस दीक्षित यांनी सांगितले आहे.
अशी आहे प्रक्रिया - कीऑस्क मशीनने तिकीट कसे काढायचे, कीऑस्क मशीनवर प्रवासाचा मार्ग निवडणे, तिकिटाचे पैसे देताना कागदी तिकीट, ई-तिकीट, यापैकी हवा तो पर्याय निवडावा. ई-तिकीट असा पर्याय निवडल्यानंतर आलेला स्कॅनर आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करावा. स्कॅन केल्यानंतर आपल्या व्हाट्सअप क्रमांकावर ओटीपी येईल ,हा ओटीपी की कीऑस्क मशीन मध्ये टाईप करावा. ओटीपी मान्य झाल्यावर आपल्याला मोबाईलवर लिंक मिळेल, या लिंकवर क्लिक केल्यानंतर प्रवाशांना तिकीट दिसणार आहे. नवीन सुविधामुळे प्रवाशांना वेळेची बचत करता येणार आहे. त्याचबरोबर लाईन मध्ये थांबून तिकीट काढत बसण्याची वाट बघावी लागणार नाही आणि आपल्या व्हाट्सअप वर तिकीट आल्यामुळे अतिशय सुलभ पद्धतीने ही सुविधा वापरता येणार आहे.