पुणे - जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. एप्रिल 2018 पासून ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. दरम्यान, रिक्त झालेल्या पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. नवल किशोर राम हे औरंगाबादचे जिल्हाधिकारी असताना एप्रिल 2018 मध्ये त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.
नवलकिशोर राम हे मूळचे बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील असून 2008 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांची नुकतीच देशातील 50 सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांचा यादीत निवड झाली होती. आयएएस झाल्यानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग नांदेडमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेत सीईओ आणि त्यानंतर बीड आणि औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.
पुण्यात नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दंगलीमुळे संवेदनशील विषय बनलेल्या कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन नेटकेपणाने केले होते. त्याचवर्षी झालेल्या हिंसाचारामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. परंतु नवल किशोर राम यांनी हा विषय संवेदनशीलपणे हाताळला. त्यानंतर पुणे शहरात गेल्यावर्षी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर त्यांच्या कार्यक्षमतेची चुणूक दिसून आली. महापूर आणि पावसाळ्यातील दुर्घटनेनंतर त्यांनी राबविलेल्या उपाययोजनांचे कौतुकही झाले. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी केलेल्या उपाययोजनांचही कौतुक होत आहे. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागात समन्वय साधत कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती उत्तमपणे हाताळली आहे.
त्यांच्या याच कामाची दखल केंद्र सरकारने घेतली असून पंतप्रधान कार्यालयात त्यांची नियुक्ती उपसचिव पदी करण्यात आली आहे. तीन आठवड्याच्या आत त्यांना पुणे जिल्हाधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचे सांगण्यात आले आहे. याआधीही पुण्यातून कुणाल कुमार आणि श्रीकर परदेशी या आयएएस अधिकार्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती - Pune latest news update
नवलकिशोर राम हे मूळचे बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील असून 2008 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. एका संस्थेने केलेल्या सर्वेनुसार त्यांची नुकतीच देशातील 50 सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांचा यादीत निवड झाली होती. याआधीही पुण्यातून कुणाल कुमार आणि श्रीकर परदेशी या आयएएस अधिकार्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाली आहे.