पुणे - मागील पंधरा दिवसांपासून राजगुरुनगर, चाकण, आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढून रुग्णांची संख्या 149 वर गेली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 113 व आळंदी-7, राजगुरुनगर- 10, चाकण 19 रुग्ण आहेत. खेड तालुक्यात 58 ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन प्रांत अधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
चाकण आळंदी व राजगुरुनगर परिसरात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या परिसरात सर्व कंपन्या सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत आहेत. या परिसरात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या प्रमाणात कामगार येतात. मात्र, कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे तेली यांनी सांगितले.
नागरिक करत आहेत कडक लॉकडाऊनची मागणी
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना शहरी व ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
करण्यात येत असून याबाबत प्रशासकीय पातळीवर बैठक झाली आहे याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असून लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले.