ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : काय घडलं त्या रात्री...

author img

By

Published : Feb 13, 2021, 10:18 PM IST

रविवारी 7 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास आमच्या घराचा दरवाजा वाजला आणि पूजा सोबत राहत असलेला तरुण आम्हाला खाली बोलवत होता. मित्राला चक्कर आली आहे, खाली चला, असे त्याने सांगितले. आम्ही खाली गेलो आणि पाहिले तर पूजा पडली होती.

puja chavan
पूजा चव्हाण

पुणे - हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. मात्र, त्या रात्री नेमके काय घडले होते, याबाबत पूजा चव्हाण शेजारी गौरी बनसोडे यांनी माहिती दिली.

गौरी बनसोडेंची प्रतिक्रिया.

काय म्हणाल्या गौरी बनसोडे?

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पुण्यातील वानवडी भागातल्या हेवन पार्कमधील लेन 10 मध्ये असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत पूजाने आत्महत्या केली होती. पूजा राहत असलेली इमारत दोन मजली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पूजाने आत्महत्या केली. पूजा चव्हाण रहात असलेल्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या समोरच बनसोडे यांचा फ्लॅट आहे. मात्र, पूजा किंवा तिच्यासोबत असलेल्या तरुणाशी कधी बोललो नाही. त्यांच्याशी परिचय नव्हता, असेही गौरी बनसोडेंनी सांगितले. गौरी याचे पती रिक्षाचालक आहेत. रविवारी रात्री खाली आलो तेव्हा पूजा पडलेली होती. दोघे तरुणदेखील त्यावेळी होते. इतर काही विचारपूस करायची मनस्थिती नव्हती. आधी तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होते. त्यामुळे तिला गौरी यांच्या पतीच्या रिक्षात टाकून दवाखान्यात नेले, अशी माहिती त्यांनी दिली.

फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी-

या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी -

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा होत असताना भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव जाहीर करत कारवाईची मागणी केली. तसेच राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन बाळगले आहे. या प्रकरणासंदर्भातली माहिती घेऊन नंतर त्यावर प्रतिक्रिया देईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते आज चिपळूण दौऱ्यावर आले होते.

यासंबंधीच्या सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : विरोधक आक्रमक, तर सत्ताधारी म्हणतात मंत्र्याचे नाव जोडणे चुकीचे

पूजा चव्हाणसाठी समाजाने रस्त्यावर उतरावे, प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ

पुजा चव्हाणला न्याय न मिळाल्यास बंजारा समाजाचा आंदोलनाचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली माहिती

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा- फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.