ETV Bharat / state

प्रेम म्हणजे प्रेम असतं..! समानतेच्या हक्कासाठी पुण्यात एलजीबीटी समुदायाची  प्राईड रॅली - organized

या रॅलीत भारतातील पहिले 'गे कपल' अमित गोखले आणि समीर समुद्र हे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, कलम 377 रद्द झाले असले तरीही एलजीबीटी समुदायातील नागरिकांना अजूनही समानतेचा हक्क मिळालाले नाही. या समुदायातील नागरिकांबद्दल अजूनही समाजात गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत यासाठीच आज प्राईड रॅली काढण्यात आली आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं..! पुण्यात एलजीबीटी समुदायाची प्राईड रॅली
author img

By

Published : Jun 2, 2019, 5:47 PM IST

पुणे - समाजाकडून समानतेची वागणूक मिळावी आणि समाजाने त्यांचा तिरस्कार करू नये, यासाठी आज एलजीबीटी(समलिंगी) समुदायाच्या वतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर प्राईड रॅली काढण्यात आली. एलजीबीटी समुदायातील नागरिकांसह काही सामाजिक कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी झाले होते. हातात मोठा सप्तरंगी ध्वज घेत, विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं," अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पुण्यातील इंद्रधनु संस्थेच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, घोषणा देत पुण्यात एलजीबीटी समुदायाची प्राईड रॅली

या रॅलीत भारतातील पहिले 'गे कपल' अमित गोखले आणि समीर समुद्र हे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, कलम 377 रद्द झाले असले तरीही एलजीबीटी समुदायातील नागरिकांना अजूनही समानतेचा हक्क मिळालेला नाही. या समुदायातील नागरिकांबद्दल अजूनही समाजात गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत यासाठीच आज प्राईड रॅली काढण्यात आली आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेपासून सुरू झालेली ही रॅली डेक्कनला वळसा घालून परत छत्रपती संभाजी बागेजवळ येऊन समाप्त झाली. या रॅलीचे संभाजी पार्क येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी ढोल ताशावर ताल धरला.

Intro:समाजाकडून समानतेची वागणूक मिळावी आणि समाजाने त्यांचा तिरस्कार करू नये यासाठी आज एलजीबीटी समुदायाच्या वतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर प्राईड रॅली काढण्यात आली. एलजीबीटी समुदायातील नागरिकांसह काही सामाजिक कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी झाले होते. हातात मोठा सप्तरंगी ध्वज घेत, विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं," अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पुण्यातील इंद्रधनु संस्थेच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Body:या रॅलीत भारतातील पहिले गे कपल अमित गोखले आणि समीर समुद्र हे ही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, कलम 377 रद्द झालं असलं तरीही एलजीबीटी समुदायातील नागरिकांना अजूनही समानतेचा हक्क मिळाला नाही. या समुदायातील नागरिकांबद्दल अजूनही समाजात चुकीचे गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत यासाठीच आज प्राईड रॅली काढण्यात आली आहे. Conclusion:जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेपासून सुरू झालेली ही रॅली डेक्कनला वळसा घालून परत संभाजी बागेजवळ येऊन समाप्त झाली. या रॅलीचे संभाजी पार्क येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी ढोल ताशावर ताल धरला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.