ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्र्याचे नाव समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण

आत्महत्येच्या कारणाबाबत स्पष्टता झालेली नसताना या प्रकरणात सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आणि आता हे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजते आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Feb 13, 2021, 9:51 PM IST

पुणे - शहरातील वानवडी भागात असलेल्या हेवन पार्क सोसायटीच्या दहाव्या गल्लीमध्ये असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी 7 फेब्रुवारीला घडली. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा प्रकार असल्याची नोंद केली. पूजा चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव. या आत्महत्येच्या कारणाबाबत स्पष्टता झालेली नसताना या प्रकरणात सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आणि आता हे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजते आहे.

पुणे

पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी अनेक स्वप्ने घेऊन बीड जिल्ह्यातून पुण्यात आली होती. सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह असलेल्या पूजाला समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ होती, पूजाला अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावर फॉलो करत होते, अशी ही पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वीच पुण्यात आली होती, आजच्या काळात प्रगती करायची असेल तर इंग्रजी शिकणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर पूजाने पुण्यात इंग्रजी शिकण्याचा क्लास जॉईन केला. पुण्यातील वानवडी परिसरात हेवन पार्क या ठिकाणी भाड्याने घर घेऊन आपला भाऊ आणि मित्रासोबत राहायला आली. मात्र, काही दिवसातच ही दुर्दैवी घटना घडली. सात फेब्रुवारीला मध्यरात्री पूजाने आत्महत्या केली. हेवन पार्क परिसरातील या इमारतीत पहिल्या मजल्यावर पूजा राहत होती आणि या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव

दरम्यान, सुरुवातीपासूनच पूजाच्या या आत्महत्ये प्रकरणी संशयाचे वातावरण होते. आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा या आत्महत्या प्रकरणात संबंध जोडला जात असल्याने पूजा आत्महत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील महिला आघाडी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस आयुक्तांना सादर केले. या प्रकारात आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव येत असल्याने या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीकडून करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अपघाताची नोंद केली. मात्र या प्रकरणात मंत्र्याचा संबंध येत असल्याने त्या दृष्टीने तपास व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली.

ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल

एकंदरीतच बीड या जिल्ह्यातून एका सामान्य कुटुंबातील पूजा चव्हाण या युवतीच्या आकस्मित मृत्यूला असलेल्या संशयाच्या वलयाने प्रकरण गंभीर बनले आहे. या युवतीसोबत राहणारा तरुण आणि त्याचे संबंधित मंत्र्यांबरोबर झालेले मोबाईलवरील संभाषण यांच्या क्लिप बाहेर आल्याने याप्रकरणात काळंबेरं असल्याची चर्चा जोर धरू लागली. हा तरुण आणि संबंधित मंत्र्यांसोबत संभाषणाच्या तब्बल बारा ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाल्या यामध्ये काही ऑडिओ क्लिपमध्ये ही तरुणी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे हा तरुण संबंधित मंत्र्याला सांगत असल्याचे देखील आढळून आले आहे. एकंदरीतच हा प्रकार महाविकास आघाडीला अडचणीत आणणारा ठरताना दिसतो आहे. मात्र, या सगळ्या प्रकारात आता बीडवरून आपले भविष्य फुलवण्यासाठी पुण्यात आलेल्या पूजाला न्याय हे सरकार देणार का? असा प्रश्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.