ETV Bharat / state

PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, 'असे' आहे दिवसभरातील वेळापत्रक - PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणीही करणार आहेत.

PM Modi Pune Visit
पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर
author img

By

Published : Aug 1, 2023, 7:54 AM IST

Updated : Aug 1, 2023, 8:58 AM IST

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 11 वाजता पुणे शहरात आगमन होणार आहेत. त्यानंतर 11.45 वाजता ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला जाणार आहेत. पंतप्रधान पावणे एक वाजता ते दोन मेट्रो ट्रेन आणि काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे. पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांच्या वापरावर बंधने येणार आहेत. पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारकचा 'लोकमान्य टिळक पुरस्कार' जाहीर झाला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी बालेवाडी येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्या संदर्भात मंदिराकडूनसुद्धा तयारी करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपती मंदिर हे संवेदनशील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी हायअलर्टसुद्धा असतो. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे आणखी खबरदारी सुरक्षा यंत्रणांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतला आहे.

पंतप्रधानांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत : दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये प्रथमच पंतप्रधान दर्शनाला येत आहे. तेव्हा सुरक्षेच्यादृष्टीने सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मंदिर ट्रस्टकडून पारंपरिक महाराष्ट्राच्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. ढोल-ताशाच्या वादनाने त्यांच्या आगमनानंतर महापूजा व महाआरती करण्यात येणार आहे. अर्ध्या तासानंतर पंतप्रधान पुढील कार्यक्रमास जाणार आहेत. सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

असे आहे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक

  • दगडूशेठ मंदिरात दर्शन व पूजा: सकाळी 11
  • लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार: सकाळी 11 वाजून 45 मिनिटे
  • पुणे मेट्रोचा कार्यक्रम आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन: दुपारी 12:45 मिनिटे

विरोधक आंदोलन करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत पंतप्रधानांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात येणार असल्याचा ठराव विरोधी पक्षांच्या बैठकीत करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी गो बॅक मणिपूर आणि फेस द पार्लमेंट, अशी या आंदोलनाची टॅगलाईन सुद्धा तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. एकाचवेळी शरद पवार मोंदीसोबत व्यासपीठावर तर दुसरीकडे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलन करत असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. Dagdusheth Halwai Ganapati : दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी
  2. PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात विरोधी पक्ष करणार आंदोलन, 'ही' आहे मागणी
  3. PM Modi Pune Visit : PM मोदी आज पुणे दौऱ्यावर; मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Last Updated : Aug 1, 2023, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.