ETV Bharat / state

गणेशोत्सव २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज - Pimpri-chinchwad police ready

पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन सोहळा पार पडतो. शहरातील ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देणार आहे. त्यासाठी पोलीस देखील सज्ज असणार आहे. पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या काठावर घरगुती बाप्पा तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन करण्यात येतात. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सज्ज झाले आहे.

गणेशोत्सव 2019
author img

By

Published : Sep 10, 2019, 4:44 PM IST

पुणे - देशभरासह राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सार्वजनिक मंडळे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढतात. या मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. विर्सजन घाटावर तसेच मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

गणेशोत्सव २०१९ : पिंपरी-चिंचवड पोलीस यंत्रणा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज

हेही वाचा - बाप्पा मोरया..! कलम ३७० वर परभणीत सजीव देखावा सादर

पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन सोहळा पार पडतो. शहरातील ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देणार आहे. त्यासाठी पोलीस देखील सज्ज असणार आहे. पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या काठावर घरगुती बाप्पा तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन करण्यात येतात. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सज्ज झाले आहे. यासाठी हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून राज्यातून पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी बोलवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

हेही वाचा - देशासह अमेरिकेतही गणेशोत्सवाची धूम, एडिनबर्गचे रस्ते दणाणले बाप्पांच्या जयघोषाने

दरम्यान, बाहेरून आलेले ०५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार होमगार्ड, एसआरपीएफची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास २ हजार ५०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलीस मित्र आणि नागरिक पोलीस मित्र असे मिळून २५० जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त पोकळे यांनी केले आहे.

Intro:mh_pun_01_ganpati_miravnuk_avb_mhc10002Body:mh_pun_01_ganpati_miravnuk_avb_mhc10002

Anchor:- सार्वजिनक मंडळे ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढतात. या मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर असणार असून विर्सजन घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मोठा बंदोबस्त विसर्जन मिरवणुकी दरम्यान राहणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन सोहळा पार पडतो. शहरातील ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देणार आहे. त्यासाठी पोलीस देखील सज्ज असणार आहे. पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या काठावर घरगुती बाप्पा तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन करण्यात येतात. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सज्ज झालं असून हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे, त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून राज्यातून पोलीस फौज फाटा बंदोबस्तासाठी बोलवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. दरम्यान, बाहेरून आलेले ०५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, १५ सहायक पोलिस निरीक्षक, १ हजार होमगार्ड, एस.आर.पी.एफ ची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास २ हजार ५०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलिस मित्र आणि नागरीक पोलीस पोलीस मित्र असे मिळवून २५० जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.

बाईट:- रामनाथ पोकळे- अप्पर पोलीस आयुक्त Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.