ETV Bharat / state

बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक

author img

By

Published : Jan 23, 2020, 9:21 AM IST

बारामतीत शिक्षणानिमित्त राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

crime news
बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

पुणे - बारामतीत शिक्षणानिमित्त राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विशाल सुनील महाजन (वय २०, रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

हेही वाचा - शरद पावर हे राजकारणातील चंद्रगुप्त - नाना पाटेकर

मूळच्या इंदापूरच्या असलेल्या महिलेने याबाबत तक्रार दाखल केली. १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत भीगवण व बारामतीतील एका लॉजवर हा प्रकार घडला. तक्रारीत अल्पवयीन मुलीला भूलथापा देत, प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचे म्हटले आहे. १५ जानेवारीला तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत जेजुरी येथे नेले. तेथे तिच्या डोक्यात कुंकू भरत सोबत फोटो काढले ते व्हॉटसअ‌ॅप स्टेटसवर टाकत तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करत तक्रारदाराच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

Intro:Body:अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार 

आरोपी अटक

बारामती- बारामतीत शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱया १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी विशाल सुनील महाजन (वय २०, रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 मूळच्या इंदापूरच्या असलेल्या महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली. १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत भिगवण व बारामतीतील एका लॉजवर ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना भुलथापा देत, प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यासी जबरदस्तीने शरीरसंबंध केले.  १५ जानेवारी रोजी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत तिला जेजुरी येथे नेले. तेथे तिच्या डोक्यात कुंकू भरत सोबत फोटो काढत ते व्हाटसअप स्टेटसवर टाकत तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करत फिर्यादीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली. 

     Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.