ETV Bharat / state

Petgala Pet Show : प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी पुण्यात 'पेटगाला पेट शो' चे आयोजन - पुण्यात प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी

पुण्यामध्ये कुत्रे मांजरांचा सर्वात भव्यदिव्य पाळीव प्राणी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या 'पेटगाला पेट शो' (Petgala Pet Show) मध्ये कुत्री आणि मांजरी दत्तक घेता येणार आहे. (Petgala Pet Show Organized in Pune).

Petgala Pet Show
Petgala Pet Show
author img

By

Published : Nov 10, 2022, 9:32 PM IST

पुणे: पुण्यामध्ये पाळीव प्राणी प्रेमी करीता पेटगाला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Petgala Pet Show). या मेळाव्यामध्ये पाळीव प्राण्यांना आनंद साजरा करण्याची एक खास संधी प्रत्येकाला दिली जाईल. हा कार्यक्रम 13 नोव्हेंबर रोजी डेक्कन कॉलेज ग्राउंडवर सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. (Petgala Pet Show Organized in Pune).

साकीब पठाण, आयोजक

प्राण्यांविषयी संवेदनशीलता जागृत करण्यासाठी आयोजन - सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. मात्र जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. याच क्रूरतेला आळा घालण्यासाठी प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पेटगाला हा पेट शो सदैव तत्पर असतो. पेटगाला पेट शो अंतर्गत आणि MARS Petcare द्वारे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची उजवी बाजू म्हणजे दत्तक मोहिमेचा समावेश. या मोहिमेचा उद्देश म्हणजे शक्य तितक्या जास्त मांजरी आणि कुत्र्यांना अशा घरामध्ये प्रदान करायचे जिथे त्यांची विशेष काळजी आणि निगा राखली जाईल, हा उच्च उद्देश उराशी बाळगून हा कार्यक्रम रेखाटला जातो. इच्छुक सदस्य नक्कीच या कार्यक्रमाला विनामूल्य येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवू शकतात. येत्या रविवारी पुणे येथे हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Petgala Pet Show
पेटगाला पेट शो

200 हून अधिक मांजरींचा सहभाग - पेटगाला हा पाळीव प्राणी प्रेमींचा एक आकर्षक मेळावा आहे. या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा आनंद साजरा करण्याची एक खास संधी प्रत्येकाला दिली जाईल. हा कार्यक्रम १३ नोव्हेंबर रोजी डेक्कन कॉलेज ग्राऊंडवर सकाळी १० पासून सुरू होणार आहे. फेलाइन क्लब ऑफ इंडिया या ब्रँडचे, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पोषण यामधील प्रमुख, संयुक्त विद्यमाने चार आंतरराष्ट्रीय परीक्षक या कार्यक्रमाचा निकाल जाहीर करतील. अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), श्रीमती जॅन रॉजर्स (यूएसए), मिस्टर फडली फुआद (इंडोनेशिया), मिस्टर इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) हे या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण करणार आहेत. 200 हून अधिक मांजरींचा सहभाग असल्याची माहिती FCI चे अध्यक्ष साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि इंडीमाऊ यांसारख्या विविध जाती कार्यक्रमादरम्यान उपस्थित असतील. इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्तीही अनुभवायला मिळणार आहे. डॉग रनिंग गेम्स, पूल पार्टी, पेट फॅशन शो, इतर खेळ इत्यादी उपक्रम देखील यावेळी राबविण्यात येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.