ETV Bharat / state

पोलिसांच्या रूट मार्चवर पृष्पवृष्टी; नागरिकांचा 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' चा जयघोष

भारत माता की जय, वंदे मातरम, महाराष्ट्र पोलीस दलाचा विजय असो अशा घोषणांनी आज पिंपळे गुरव परिसर नागरिकांनी दणाणून सोडला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी रूट मार्च काढला. तेव्हा हे चित्र पहावयास मिळाले.

author img

By

Published : May 2, 2020, 10:33 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडसह राज्यात ठिकठिकाणी पोलीस कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यास नागरिक कमी पडत नसल्याचे वारंवार दिसत आहे. शहरातील पिंपळे गुरव परिसरात आज पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन जागोजागी सन्मानित केले. टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचे मनोबल वाढवले.

भारत माता की जय, वंदे मातरम, महाराष्ट्र पोलीस दलाचा विजय असो अशा घोषणांनी आज पिंपळे गुरव परिसर नागरिकांनी दणाणून सोडला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी रूट मार्च काढला. तेव्हा हे चित्र पहावयास मिळाले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पिंपळे गुरव परिसरात काही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील परिसर सील करण्यात आला आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून आज रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि इतर कर्मचारी यात सहभागी झाले होते. पोलिसांनी साठफुटी रोड येथून रूट मार्चला सुरुवात केली. विविध गल्ल्यांमधून मार्ग काढत असताना प्रत्येक ठिकाणी नागरिक टाळ्या, शंखनाद करून पोलिसांना प्रोत्साहन देत होते. काही ठिकाणी तर परंपरा असलेली शाल, टोपी आणि श्रीफळ देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यामुळे पोलीस अधिकारी भारावून गेले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.