ETV Bharat / state

कोरोनाच्या भीतीने पुण्यातील नागरिकांची गावाकडे झेप

author img

By

Published : Mar 14, 2020, 7:34 PM IST

Updated : Mar 14, 2020, 8:02 PM IST

शहर सोडणाऱ्यांमध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या वाढत असल्याने खासगी बसमध्ये गर्दी झाल्याचे चित्र आहे. तसेच काल रात्रीपासून खासगी बसच्या तिकिटांचे दर देखील दोनशे रुपयांनी वाढले आहे.

travels rate increase pune
खासगी बस

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून शाळा, चित्रपटगृह, जिम, जलतरण तलाव, मॉल्स, शाळा आदी बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकजण कोरोना विषाणूमुळे भयभीत असून त्यांनी गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे खासगी बसला काल रात्रीपासून गर्दी झाली असून बस प्रावासाचे भाडे देखील वाढले आहे.

माहिती देतान ट्रॅव्हल एजंट

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कष्टकरी नागरिकांची मोठी संख्या आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीपोटी नागरिकांनी गावाकडली वाट धरली आहे. शहरात तीन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाची ठिकाणे, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे ज्यांच्या मनात कोरोनाविषयी धास्ती होती. त्यांनी थेट गावाकडे जाणे पसंद केले आहे.

शहर सोडणाऱ्यांमध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या वाढत असल्याने खासगी बसमध्ये गर्दी झाल्याचे चित्र आहे. तसेच काल रात्रीपासून खासगी बसच्या तिकिटांचे दर देखील २०० रुपयांनी वाढले आहे. याबाबत शहरातील ट्रॅव्हल्स चालक शंकर घुबे यांना विचारले असता, त्यांनी शहर सोडून जाणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांची संख्या जास्त असल्याचे सांगितले. सोबतच नागरिकांच्या मनात करोनाची भीती असल्यामुळे ते ऑनलाईन बुकिंगचा पर्याय निवडत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा- गँगस्टर छोटा राजनच्या पुतणी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Last Updated : Mar 14, 2020, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.