ETV Bharat / state

पुण्यात गतिरोधकावर जोरात बस आदळल्याने प्रवाशाचा पडला दात; चालकावर गुन्हा दाखल - पुणे बस अपघात बातमी

भरधाव वेगात असलेली बस भोसरी उड्डाण पुलाच्या पुढे येताच गतिरोधकावरून जोरात आदळली. या घटनेत बसमधील अनेक प्रवाशी जोरात आदळले. या घटनेत एक महिला, एक मुलगा व भरत चिखले हे जखमी झाले आहेत. यात चिखले यांचा दात पडला आहे.

गतिरोधकावर जोरात बस आदळल्याने प्रवाशाचा पडला दात
author img

By

Published : Nov 12, 2019, 4:30 PM IST

पुणे - एसटी बसने अनेक प्रवाशी प्रवास करतात. मात्र, एका एसटी बस प्रवाशाला चालक आणि बस प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. बस गतिरोधकावर जोरात आदळल्याने यात प्रवाशाचा दात पडल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. भरत सोनू चिखले (वय-५५) असे या जखमी प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी बस चालक नितीन भास्कर पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

गतिरोधकावर जोरात बस आदळल्याने प्रवाशाचा पडला दात

हेही वाचा- आसनगावजवळ कार आणि गॅस टँकरमध्ये भीषण अपघात; २ जण जागीच ठार, २ गंभीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखले हे मंचर येथून पुण्याच्या दिशेने येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले होते. ते पाठीमागच्या सिटवर बसले होते. बसमध्ये अनेक प्रवाशी होते. अमळनेर ते पुणे अशी ही बस होती. भरधाव वेगात असलेली बस भोसरी उड्डाण पुलाच्या पुढे येताच गतिरोधकावरून जोरात आदळली. या घटनेत बसमधील अनेक प्रवाशी जोरात आदळले. घटनेत एक महिला आणि मुलगा व भरत चिखले हे जखमी झाले आहेत. दरम्यान, चिखले यांचा या घटनेत दात पडला आहे. बस काही अंतरावरून थांबविल्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आली. तत्पूर्वी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात आले. दरम्यान, भोसरी पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप चिखले यांनी केला. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Intro:mh_pun_02_av_bus_accident_mhc10002Body:mh_pun_02_av_bus_accident_mhc10002

Anchor:- एसटी बस ने अनेक प्रवाशी प्रवास करतात. वाट पाहीन पण एसटी ने च जाईल अस म्हटलं जातं. मात्र, एका एसटी बस प्रवाशाला चालक आणि बस प्रशासनाच्या हलगर्जीपणा चा चांगलाच फटका बसला आहे. बस आढळून प्रवाशाचा दात पडल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. भरत सोनू चिखले वय-५५ असे या जखमी प्रवाशाचे नाव असून त्यांनी बस चालक नितीन भास्कर पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिखले हे मंचर येथून पुण्याच्या दिशेने येण्यासाठी एसटी बस मध्ये बसले होते. ते पाठीमागच्या सिटवर बसले होते. बस मध्ये अनेक प्रवाशी होते. अमळनेर ते पुणे अशी ही बस होती. भरधाव वेगात असलेली बस भोसरी उड्डाण पुलाच्या पुढे येताच गतिरोधकावरून जोरात आदळली. या घटनेत बसमधील अनेक प्रवाशी जोरात आदळले, घटनेत एक महिला आणि मुलगा तर फिर्यादी भरत चिखले हे जखमी झाले आहेत. दरम्यान, चिखले यांचा या घटनेत दात पडला आहे. ते समोरील सीटवर जोरात आदळले. बस काही अंतरावरून थांबविल्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आली तत्पूर्वी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवून देण्यात आले. दरम्यान, भोसरी पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप चिखले यांनी केलाय. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून अद्याप बस चालकाला अटक नाही. घटने चा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.