पुणे - पुरंदर तालुक्यातील मौजे गराडे येथे कंजारभाट समाजातील एका जोडप्याला जातपंचायतीने वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, 20 नोव्हेंबरला गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत हे पाचही आरोपी फरार आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
पुरंदर तालुक्यातील घटनेप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करावी - प्रवीण दरेकर
या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, 20 नोव्हेंबरला गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत हे पाचही आरोपी फरार आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
पुरंदर
पुणे - पुरंदर तालुक्यातील मौजे गराडे येथे कंजारभाट समाजातील एका जोडप्याला जातपंचायतीने वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, 20 नोव्हेंबरला गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत हे पाचही आरोपी फरार आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
पुरंदर तालुक्यातील सासवड जवळील मौजे गराडे येथील कंजारभाट समाजातील एका महिलेने वडिलोपार्जित मालमत्तेचा निवडा जात पंचायतीसमोर सुरू असताना त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे चिडलेल्या जात पंचायतीच्या पंचांनी महिला आणि तिच्या पतीला समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात या जोडप्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. परंतु, समाजाच्या दबावामुळे जोडपे पुढे येऊन बोलण्यास तयार नाही, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. परंतु, आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
येत्या अधिवेशनात आवाज उठवणार
अशा पद्धतीची प्रकरणे घडू नयेत, यासाठी जनजागृती करण्यात यावी. तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आणि असे प्रकार रोखले जावेत, यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे दरेकर यांनी यावेळी म्हटले आहे.