पुणे - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याचा अनेक उद्योग-धंद्यांवर परिणाम झाला. पुस्तके खरेदी-विक्रीवरही त्याचा परिणाम दिसून आला. मात्र, लॉकडाऊनच्या काळात वाचकांनी ऑनलाइन पुस्तके खरेदीवर भर दिल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. दुकानांमध्ये येऊन प्रत्यक्ष पुस्तकांची खरेदी होण्याचे प्रमाण कमी असले तरी ऑनलाइन पद्धतीने नागरिकांनी या काळात पुस्तकांची खरेदी केली आहे.
विविध ऑनलाइन पुस्तके खरेदी साइट्सवरून पुस्तकांची मोठी खरेदी झाल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळात ऑनलाईन पुस्तके खरेदीमध्ये तब्बल तिपट्टीने वाढ झाली आहे. पुस्तक प्रकाशन व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांकडून याबाबत माहिती देण्यात आली. विविध विषयांवर माहिती देणारी पुस्तके तसेच शाळा बंद असल्याने मुलांसाठी देखील विविध पुस्तकांची मागणी पालकांकडून होताना या काळात दिसून आली. एकंदरीतच पुस्तके वाचनाकडे पुन्हा एकदा वाचकांचा कल झुकत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. पुस्तक, प्रकाशन व्यवसायासाठी तसेच लेखन, साहित्य या क्षेत्रासाठी ही समाधानकारक बाब असल्याचे मत प्रकाशन क्षेत्रातले जाणकार व्यक्त करत आहेत. वैद्यकीय क्षेत्र, लहान मुलांच्या संदर्भातील पुस्तकांना वाचकांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली असल्याचे व्यवसायिक सांगतात.
हेही वाचा - कंगनाचं शिवसेनेला आव्हान; 'या तारखेला मुंबईत येतेय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा'