ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव खासगी बसची टेम्पोला धडक; एकाचा मृत्यू, 9 जखमी - ट्रव्हलच्या अपघातामध्ये एक ठार

भरधाव वेगात असलेल्या बस वरील चालकाचा ताबा सुटून समोरील टेम्पोला बसने जोरात धडक दिली. यात, बसच्या कॅबीनमध्ये बसलेला व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, बस आणि टेम्पो मधील एकूण 9 जण जखमी झाले.

खासगी बसची टेम्पोला धडक
खासगी बसची टेम्पोला धडक
author img

By

Published : Jan 11, 2021, 8:42 AM IST

Updated : Jan 11, 2021, 2:16 PM IST

पुणे - मुंबई- बंगळुरू महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने टेम्पोला भीषण धडक दिली. यात, एकाचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. बजरंग गायकवाड (रा.लातूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रावेत पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

खासगी बसची टेम्पोला धडक;
महामार्गावर बस चालकाचा ताबा सुटला अन...पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगीर वरून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील किवळे हद्दीत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बस वरील चालकाचा ताबा सुटून समोरील टेम्पोला बसने जोरात धडक दिली. यात, बसच्या कॅबीनमध्ये बसलेला व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, बस आणि टेम्पो मधील एकूण 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औंध जिल्हा रुग्णालय आणि काही जणांना इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 11, 2021, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.