ETV Bharat / state

Pune Crime News : धक्कादायक : दुचाकीला रस्ता न दिल्याने लाथाबुक्यांनी मारहाण करुन केला खून

पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या आंदगावमध्ये रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ दुचाकीला रस्ता देण्यावरून झालेल्या भांडणातून तीन जणांनी एका ३८ वर्षीय मोटार सायकलस्वाराचा लाथा बुक्क्यांनी मारत खून केला ( one death after beaten motorcycle rider in pune ) आहे.

one death after beaten motorcycle rider in pune
लाथाबुक्यांनी मारहाण करुन केला खून
author img

By

Published : May 10, 2022, 12:33 PM IST

पुणे - पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या आंदगावमध्ये रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ दुचाकीला रस्ता देण्यावरून झालेल्या भांडणातून तीन जणांनी एका ३८ वर्षीय मोटार सायकलस्वाराचा लाथा बुक्क्यांनी मारत खून केला आहे.

तीन आरोपींना अटक - मावळ तालुक्यातील तुंगी येथील सुभाष विठ्ठल वाघमारे ( subhash vitthal waghmare ) हा मुंबईतील अंधेरी येथे खासगी लक्झरी बस चालक म्हणून कामाला होता. तो गावी आला असता, रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या राजेंद्र जगन्नाथ मोहोळ, संग्राम सुरेश मोहोळ आणि समीर दीपक करपे या तिघांनी वाघमारे यांना मारहाण करत खून केला. असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली, असल्याची माहिती देखील पोलिसांनी यावेळी दिली आहे.

काय आहे प्रकरण - या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वाघमारे 6 मे रोजी मावशीचे निधन झाल्यानंतर लोणावळ्याला आले होते. त्यांची पत्नी व तीन मुले आंदगाव येथे सासरच्या मंडळींकडे राहतात. रविवारी ते पत्नी व मुलांना भेटण्यासाठी उरवडे-लवासा रस्त्याने आंदगाव येथे जात होते. त्याचा चुलत भाऊ राजेश अंकुश कुवर हा देखील यावेळी त्याच्यासोबत मोटरसायकलवर होता.

मारहाणीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - कुवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदगावकडे येत असताना राजेंद्र मोहोळ यांनी त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना रस्ता दिला गेला नाही. राजेंद्रने त्यांना ओव्हरटेक करून वाघमारेची मोटारसायकल थांबवली आणि तिची चावी काढली, त्यामुळे बाचाबाची झाली. आणि त्याचे रुपांतर नंतर भांडणात झाले नंतर आरोपी राजेंद्र मोहोळ याने इतर दोन आरोपींना फोन करून घटनास्थळी बोलवत वाघमारे यांना जबर मारहाण केली, त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Paan Worth Rs 1 Lakh : अबब! 1 लाखाचं पान; मुंबईतील एमबीए तरूणाची 'द पान स्टोरी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.