ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर दहा जणांना डिस्चार्ज

दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे भोसरी व खराळवाडी येथील रहिवासी असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर डिस्चार्ज देण्यात आलेले कोरोनामुक्त हे मोशी, रुपीनगर, तपोवन पिंपरी येथील रहिवासी आहेत.

pimpari chinchwad corona update  पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट  पिंपरी चिंचवड कोरोनाबाधित  pimpari chinchwad corona positive cases  pimpari chinchwad death due to corona
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर दहा जणांना डिस्चार्ज
author img

By

Published : May 11, 2020, 10:07 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात दोन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भोसरी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १६९ पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्त व्यक्तींची संख्या १०७ वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर दहा जणांना डिस्चार्ज

दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे भोसरी व खराळवाडी येथील रहिवासी असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर डिस्चार्ज देण्यात आलेले कोरोनामुक्त हे मोशी, रुपीनगर, तपोवन पिंपरी येथील रहिवासी आहेत.

मध्यरात्रीपासून हा भाग सील -

हुतात्मा चौक, भोसरी येथील न्यू जनता बेकरी-भोसरी आळंदी रोड-श्री बालाजी मंदिर-मार्केट रोड-हरेश्वर किराणा स्टोअर्स-न्यू जनता बेकरी हा परिसर रविवारी मध्यरात्री ११.०० वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. संबंधित परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.