चंडीगड (सोनीपत) - पुणे शहरामध्ये अपहरण, खून आणि 40 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी हरियाणातील सोनीपतमधून अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि सोनीपत पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये खरखोदा भागत हा आरोपी सापडला.
3 फेब्रुवारीला एफएफआय चिट फंड कंपनीचे मालक आनंद साहेबराव यांचे त्यांच्या घराजवळून अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांच्या फोनवरून कंपनीच्या व्यवस्थापकाला आरोपीने खंडणीसाठी फोन केला. आरोपीने ४० लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेखर यांनी दिली.
दीपक, असे या आरोपीचे नाव असून तो ऊसाचा रस विकण्याचे काम करतो. या प्रकरणातील दुसऱ्या अपहरणकर्त्यांनी दीपकला खंडणी मागण्यासाठी सांगितले होते. दीपकने सांगितल्याप्रमाणे मुख्य आरोपींना खंडणी मिळवून दिली. याकामासाठी त्याला 2 लाख 50 हजार रुपये मिळाले.
खरखोदामध्ये मामाच्या घरी लपला होता आरोपी -
काम झाल्यानंतर आरोपी दीपक पुण्यातून हरियाणाला गेला. तिथे सोनीपत जिल्ह्यातील खरखोदा येथील मामाच्या घरी गेला होता. आरोपी हरियाणामध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यांनी सोनीपत पोलिसांच्या मदतीने कारवाई करत आरोली अटक केली. या प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. बाबू, पप्पू, सागर आणि प्रभू अशी या आरोपींची नावे आहेत.
चीट फंड कंपनीच काम करतो मुख्य आरोपी -
प्रभु नावाचा मुख्य आरोपी चिट फंड कंपनीमध्येच नोकरी करत होता. वेतन वाढवण्याच्या मुद्द्यावरून त्याचा मालक आनंद यांच्यासोबत वाद झाला होता. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने कंपनी मालकाचे अपहरण केले. ४० लाख रुपये खंडणी वसूल करून आनंद यांचा खून केला होता.