पुणे: रमजानचा महिना सर्वात पवित्र मानला जातो. मुस्लिम धर्मीयांनसाठी हा महिना खूप महत्वाचा असतो. यावर्षी रमजान येत्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. बाजारात रमजान निमित्त लागणारे विविध साहित्य तसेच खाद्य पदार्थ हे बाजारात दाखल झाले आहे. रमजानमध्ये जो दिवसभर उपवास केला जातो. त्यानंतर तो उपवास खजूर खाऊन सोडतात. याच खजुराचे विविध प्रकार हे सध्या पुण्यातील विविध बाजारपेठेत दाखल झाले आहे.
विविध प्रकारचे खजूर दाखल : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील बाजारात विविध प्रकारचे खजूर हे दाखल झाले आहे. यात अज्वा, मुज्जरब, कलमी, मदिना, मगजोल, फरत, सुलतान, सगाई, अंबर, केमिया, मरुकसार, हसना, बुरारी,असे विविध खजूर हे दाखल झाले आहे. यंदा बाजारभाव हे खूप वाढले आहेत. असून प्रती किलो मागे 30 ते 40 रुपयांची वाढ ही झालेली आहे. जेवढा खजूर बाजारात यायला पाहिजे तेवढा खजूर बाजारात आलेला नाही. त्यामुळे खजूर हे यंदा कमी प्रमाणात आलेले आहे, अशी माहिती यावेळी खजूर विक्रेते अब्दुल रझाक शेख यांनी दिली आहे.
बाजारात लगबग: रमजान महिन्यात खजूरला खूपच जास्त महत्त्व असून, या दिवसात उपवास सोडण्यासाठी खजूरचा वापर केला जातो. इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ असे मोहम्मद पैगंबर यांनी देखील रमजान मध्ये खजूरचे महत्त्व सांगितले आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव या महिन्यात खजूराचा वापर करत असतात. सध्या पुण्यातील मार्केटयार्ड तसेच लष्कर परिसरातील शिवाजी मार्केट, गुरुवार पेठ येथील मोमीनपुरा, कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस तसेच शहरातील विविध ठिकाणी रमजानचे उपवास सोडण्याकरिता विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. नागरिक रमजान महिन्याच्या आधीच रमजान निमित्त लागणारे साहित्य खरेदी करून ठेवत आहे.
विविध देशांमधून खजूर दाखल: पुण्यात जगभरातील विविध देशांमधून खजूर हे येत असतात. प्रामुख्याने सौदी, इराण, इराक या ठिकाणाहून खजूर हे जास्त प्रमाणात येतात. कलमी, सुक्री, अजवा हे खजूर सौदी येथून येतात. तर झैदी , किमिया हे खजूर इराणवरून येतात. तर काही खजूर हे इराकवरून येत असतात. यंदा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कलमी खजूर हा 700 रू किलो आहे. तर फरद हे 300 रू किलो, कीमिया हा 160 रू डबा झाला आहे. सर्वात महाग खजूर हा अंबर असून त्याचे दर हे 1400 रू किलो आहे. तसेच अजवा देखील 1300 रू किलो असून बाजारात कल्मी, किमीया, झैदी असे खजूर जास्त विक्रीला जात आहे. आमच्याकडे 160 रू ते 1400 रू किलोपर्यंतचे विविध खजूर हे बाजारात दाखल झाले आहेत, असे देखील यावेळी शेख यांनी सांगितले आहे.
अत्तर, टोपी, सुरमाला मागणी: रमजान मध्ये जसे खजूरला जास्त मागणी असते. तसेच खाद्य पदार्थांशिवाय अत्तर, टोपी, सुरमा तसेच इबादत म्हणजेच प्रथानेसाठी लागणारे विविध साहित्यला देखील जास्त मागणी असते. याचे देखील दुकाने थाटलेली पहायला मिळत आहे. तसेच मशिदीत देखील स्वच्छता आणि साफसफाई तसेच सजावटीला सुरूवात झाली आहे.
हेही वाचा: Ramazan Month रमजान महिन्यास गुरुवारपासून प्रारंभ मुंबईतील मोहम्मद अली रोड सजला