पुणे - शहरातील ताडीवाला रस्त्यावरील तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज सकाळच्या सुमारास इमारतीमधून धुराचे लोट निघत होते. त्यामुळे परिसरातील लोकांनी जाऊन पाहिले असता इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या कार्यालयाला आग लागल्याचे समजले. त्यानंतर त्वरीत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.