पुणे - मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन करणार, अशीच आपली भूमिका आहे, मोर्चा काढणार असे म्हटलेले नाही, असे सांगत या मुद्द्यावर समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे, असे मत खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - म्यूकरमायकोसिसबाबत जनजागृती करा - उपमुख्यमंत्री अजित पवार
खासदार संभाजीराजे आज पुण्यातून कोपर्डी आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर निघाले, यावेळी त्यांनी सदर मत व्यक्त केले. कोपर्डी येथे जाऊन ते पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबादला मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काका साहेब यांच्या समाधीचे दर्शन ते घेणार आहेत.
दोषींवर अजूनही कारवाई झालेली नाही
संभाजी राजे म्हणाले, 2016 पासून कोपर्डी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. दोषींवर अजूनही कारवाई झालेली नाही. घटनेबाबत निकाल देण्यात आला, मात्र अद्यापही अमलबजावणी झालेली नाही, याला चार वर्षे का लागली? राज्य सरकारने काय करावे, यासाठी माझा कोपर्डी दौरा असल्याचे संभाजी राजे म्हणाले.
2016 ला कोपर्डी घटना घडली 2017 ला निकाल लागला, प्रकरण उच्च न्यायालयात गेले, दोषींचा दोन वर्षे संधीचा कालावधीही संपला, पण पुढची कारवाई का झाली नाही? असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला. आता राज्य सरकारला विनंती आहे, स्पेशल बेंचच्या माध्यमातून 6 महिन्यांत निकाल द्यावा, अशी उच्च न्यायालयाकडे मागणी करावी, असे संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत नक्षल्यांकडून काढलेल्या पत्रावर संभाजीराजेंनी भाष्य करणे टाळले. कोण काय बोलावे, ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे, असे संभाजी राजे म्हणाले.
हेही वाचा - जुन्नरमध्ये लहान मुलीसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या