ETV Bharat / state

कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंडाला बेड्या; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे हस्तगत - pimpri chinchwad crime news

पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कृष्णा नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईत गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत.

pimpri chinchwad crime news
पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
author img

By

Published : Jul 10, 2020, 1:42 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कृष्णा नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईत गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील पाच-सहा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

pimpri chinchwad crime news
पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विकास जाधव याच्यावर खूनी हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, प्राणघातक हत्यारे बाळगणे या कलमांखाली तब्बल सात गुन्ह्यांची नोंद आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना त्याचा शोध होता. बऱ्याच दिवसांपासून तो फरार होता.
pimpri chinchwad crime news
या कारवाईत गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत
आरोपी विकास जाधव हा घरकुल लगत असलेल्या पीरबाबा दर्ग्याजवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विश्‍वास नाणेकर आणि संतोष सकपाळ यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावून विकासला ताब्यात घेतले. यानंतर त्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

विकास कुख्यात आक्या बॉण्ड टोळीचा सदस्य आहे. याच टोळीतील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी टोळी वर्चस्वातून एका तरुणाचा खून केला होता. संबंधित टोळी मोठ्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असते. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी विश्वास नानेकर, मंगेश गायकवाड, चेतन सावंत, विपुल होले, संतोष सपकाळ, सचिन नलावडे, कबीर पिंजारी यांनी केली आहे. तसेच अधिक तपास अद्याप सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.