ETV Bharat / state

चक्क... वाहतूक मंत्र्यांच्याच गाडीची बनवली बनावट पीयुसी

या प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात संगमेश्वर पियुसी सेंटरचे श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Sep 18, 2019, 8:31 PM IST

पुणे - वाहनांच्या प्रदूषणाने दिवसेंदिवस हवेचे प्रदूषण वाढत आहे. वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी धूर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, पीयुसी सेंटरच्या माध्यमातून बोगस प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले. चक्क केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या चारचाकी वाहनाचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे.

माहिती देताना पोलीस

हेही वाचा - नारायणगावात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला

दिल्लीतील वाहनाला पुण्यातून प्रमाणपत्र दिले गेले आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात संगमेश्वर पियुसी सेंटरचे श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पीयूसी सेंटरचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा - रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला आग.. आग्निशामक दल घटनास्थळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत कामन्ना यांचे जंगली महाराज रस्त्यावर श्री संगमेश्वर पियुसी सेंटर आहे. 14 सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने गाडी न आणता येथून पियुसी प्रमाणपत्र घेतले आहे. प्रत्यक्षात गाडी नसतानाही, गॅस ऍनलायझर मशीनद्वारे पाहणी न करता श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना याने पियुसी प्रमाणपत्र दिले आहे.

Intro:वाहनांच्या प्रदूषणाने दिवसेंदिवस हवेच प्रदूषण वाढतंय. वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी धूर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दिलं जातं. माञ पीयूसी सेंटरच्या माध्यमातून चक्क बोगस प्रमाणपत्र दिल्याचं आढळून आलंय. ते ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या चारचाकी वाहनाचे. दिल्लीतील वाहनाला पुण्यातून प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे पीयूसी सेंटरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय...Body:प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संगमेश्वर पियुसी सेंटरचे श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत कामन्ना यांचे जंगली महाराज रस्त्यावर श्री संगमेश्वर पियुसी सेंटर आहे. 14 सप्टेंबर रोजी एका अनोळखी इसमाने गाडी न आणता येथून पियुसी प्रमाणपत्र घेऊन गेला आहे. प्रत्यक्षात गाडी नसतानाही, गॅस ऍनलायझर मशीनद्वारे पाहणी न करता श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना याने पियुसी प्रमाणपत्र दिले आहेे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.