पुणे - साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील व नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. ठरल्याप्रमाणे पवार हे साताऱ्याची लोकसभेची जागा जिंकल्यानंर लोकांचे आभार मानण्यासाठी जाणार होते. मात्र, श्रीनिवास पाटीलच पवारांना भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठाण येथे आले होते.
हेही वाचा - यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...
दरम्यान, भेटीवेळी निवडणुकीच्या प्रचारात झालेल्या सभा आणि चर्चा याबद्दल दोन्ही मित्रांच्या गप्पांचा फड रंगला होता. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या गादीचा आदर आमच्या अंतकरणात कायम राहील. मात्र, गादीचा मान संबंधितांनी ठेवला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. त्यांनी उदयनराजेंना उद्देशून टिप्पणी केली. तसेच पवार म्हणाले, गादीच्या सन्मानाची भूमिका उदयनराजेंनी न पाळल्यामुळे सातारकरांना अस्वस्थता होती. ती नाराजी सातारकरांनी या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त केली. यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, नवनिर्वाचित आमदार संजय जगताप उपस्थित होते.
शशिकांत शिंदेंचा पराभव जिव्हारी लागल्याने सातारला जाणं टाळलं - पवार
ठरल्याप्रमाणे पवार हे साताऱ्याची लोकसभेची जागा जिंकल्यानंर लोकांचे आभार मानण्यासाठी जाणार होते. मात्र, शशिकांत शिंदे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने मी तिकडे गेलो नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी, श्रीनिवास पाटील म्हणाले, साताऱ्यातून तुला लढायचयं. कागदपत्र गोळा करुन तयार कागदपत्रे गोळा करुन तयार रहा. अशी सुचना पवार साहेबांनी केली व ही बातमी सर्वत्र पसरली व लोक घराकडे जमू लागले. ते म्हणू लागले की, पवार साहेबांचं पाठबळ आता तुमच्या मागे आहे. वचपा काढण्याची हीच वेळ अृसून माझ्यासाठी पवार साहेबांनी भर पावसात सभा घेतली तरुण पोरं कुडकूडली मात्र धो-धो पावसात पवार साहेबांनी भाषण केले. या भाषणाचा अखंड महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम झाला. असल्याचेपाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आता कुठेतरी पाय रोवून उभे रहा. कुठलातरी एक पक्ष धरून राहा. सामान्य माणसाच्या जीवनात डोकावून बघा व पुन्हा एकदा उभा राहण्याचा प्रयत्न करा. असा सल्लाही यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांना दिला.
हेही वाचा - हरियाणा विधानसभा : अपक्ष अन् बंडखोर आमदारांचा भाजपला पाठिंबा, सत्ता स्थापनेच्या निकट