ETV Bharat / state

उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे - नारायण राणे

उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवण्याचा थोडाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही, माहीत नाही. मात्र, राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. या उलट देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय योग्य पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे टाळले नाही. त्यांनी सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडविले, असेही राणे म्हणाले.

pune
उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे
author img

By

Published : Jan 26, 2020, 4:06 AM IST

पुणे - उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात एकदाही प्रयत्न केले नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे किती नुकसान होईल, याचे माहीत नाही पण राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. ते मुख्यमंत्री होतील, असे कधीच वाटले नव्हते. माझ्या महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे जाईल याची चिंता मला आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. शनिवारी पुण्यातील 'सॅटर्डे क्लब' या कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे

हेही वाचा - 'शिवसेनेच्या तालमीतच मी तयार झालो, बाळासाहेब माझे गुरू'

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवण्याचा थोडाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही, माहीत नाही. मात्र, राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. या उलट देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय योग्य पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे टाळले नाही. त्यांनी सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडविले, असेही राणे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला घडवले असून आजही तेच आपले गुरू असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - 'राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटतेय, रोज नवीन काहीतरी बाहेर काढताहेत'

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

नाईट लाईफ हा केवळ 'बालहट्ट'

मुंबईतील 'नाईट लाईफ'च्या प्रश्नावर राणे म्हणाले, कोणत्याही मुंबईकराने 'नाईट लाईफ'ची मागणी केली नव्हती. नाईट लाईफ हा केवळ 'बालहट्ट' आहे. बालहट्ट पुरवण्या पेक्षा मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांची सुरक्षितता विचारात घेणे गरजेचे आहे, असे म्हणताना राणे यांनी नाईट लाईफ या संकल्पनेवर टीका केली.

Intro:Pune:-
उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे - नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री आहेत..मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात एकदाही प्रयत्न केले नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे किती नुकसान होईल याचे माहीत नाही पण राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. ते मुख्यमंत्री होतील, असे कधीच वाटले नव्हते. माझ्या महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे जाईल याची चिंता मला आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे

पुण्यातील एका सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या 'सॅटर्डे क्लब' या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवण्याचा थोडाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही, माहीत नाही. मात्र, राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षात अतिशय योग्य पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे टाळले नाही. त्यांनी सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडविले, असेही राणे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला घडले असून आजही तेच आपले गुरू असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.

नाईट लाईफ हा केवळ 'बालहट्ट' आहे.

मुंबईतील 'नाईट लाईफ'च्या प्रश्नावर राणे म्हणाले, कोणत्याही मुंबईकराने 'नाईट लाईफ'ची मागणी केली नव्हती. नाईट लाईफ हा केवळ 'बालहट्ट' आहे. बालहट्ट पुरवण्या पेक्षा मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांची सुरक्षितता विचारात घेणे गरजेचे आहे, असे म्हणतात राणे यांनी नाईट लाईफ या संकल्पनेवर टीका केली.Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.