ETV Bharat / state

दफनभूमीसाठी महापालिकेच्या आवारात मृतदेह आणून आंदोलन - demand

खराडी परिसरात मुस्लीम समाजाची दफनभूमी नाही. दफनभूमी व्हावी यासाठी मागील ३ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेवटी गुरुवारी (ता.07) एका व्यक्तीचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणून दफणभूमीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलन करताना नागरिक
author img

By

Published : Mar 8, 2019, 12:53 PM IST

पुणे - खराडी परिसरात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात मृतदेह आणून मुस्लीम समाजाकडून आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

बापूसाहेब पठारे

खराडी परिसरात मुस्लीम समाजाची दफनभूमी नाही. दफनभूमी व्हावी यासाठी मागील ३ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेवटी गुरुवारी (ता.07) एका व्यक्तीचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणून दफणभूमीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना बापूसाहेब पठारे म्हणाले की, आम्ही दफनभूमीसाठी सातत्याने मागणी करत आहोत. मात्र, महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोणी मृत झाल्यास खराडी परिसरातील रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच आम्हाला प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महापालिकेच्या आवारात मृतदेह आणावा लागला.

दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांनी दफनभूमीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन लगेच मागे घेण्यात आले.

Intro:पुण्यातील खराडी परिसरात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात मृतदेह आणून मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Body:खराडी परिसरात मुस्लिम समाजाची दफनभूमी नाही. ही दफनभूमी व्हावी यासाठी मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जातोय. परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शेवटी आज एका व्यक्तीचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणून दफणभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Conclusion:यावेळी बोलताना बापूसाहेब पठारे म्हणाले, मागील तीन वर्षापासून आम्ही दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी ही मागणी करत आहोत. परंतु प्रशासनाकडून सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कुणी मयत झाल्यास खराडी परिसरातील रहिवाश्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच आम्हाला प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महापालिकेच्या आवारात मृतदेह आणावा लागला.

दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी दफनभूमीचा हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन लगेच मागे सुद्धा घेण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.