चाकण (पुणे) - खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील एका ७० वर्षीय महिलेची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुरकुंडी येथील सखुबाई बबन राऊत ( वय ७० वर्ष, रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) असे हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. याप्रकरणी काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-पाण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत बोलवले; अन् केला लैंगिक अत्याचार