ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा कोयत्याने वार करून तरुणाचा खून; आरोपीला अटक - Pimpri Chinchwad murder

पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

f
घटनास्थळाचा फोटो
author img

By

Published : Jul 12, 2021, 9:35 PM IST

Updated : Jul 12, 2021, 10:18 PM IST

पिंपरी-चिंचवड(पुणे) - शहरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आकाश उर्फ मकसुद विजय जाधव याला बेड्या ठोकल्या असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - पंकजा मुंडे उद्या घेणार नाराज समर्थकांची भेट

  • कोयत्याने वार करून तरुणाचा खून -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कानिफनाथचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला आहे. आरोपी आकाश हा कानिफनाथच्या शेजारी राहायचा. परंतु, दोनवेळेस आकाशला तेथील काही तरुणांनी बेदम मारहाण केली होती. ही मारहाण कानिफनाथच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय आकाशला होता. या घटनेनंतर त्याला इतर ठिकाणी स्थायिक व्हावं लागलं होतं. त्यामुळं याचा राग आकाशच्या मनात होता.

  • चिखली पोलिसांची कारवाई -

दरम्यान, रविवारी दीडच्या सुमारास कानिफनाथ हा रस्त्यावर तरुणाशी बोलत थांबला होता, हे हेरून आकाशने कानिफनाथच्या नकळत थेट मानेवर कोयत्याने वार केला. बेसावध असलेला कानिफनाथ जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटला. त्याच्या पाठीमागे कोयता घेऊन आकाश धावत होता. काही अंतरावर गाठून कानिफनाथवर कोयत्याने वार करण्यात आले. शिवाय दगडाने ठेचून खून केला. या घटनेनंतर आरोपी फरार. झाला होता. परंतु, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरहरी नानेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, संबंधित आरोपी हा पत्राशेड येथे लपून बसले आहेत. त्यानुसार, सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. यात एक अल्पवयीनसुद्धा सहभागी असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - VIDEO : हिमाचलमध्ये ढगफुटी.. मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे रुप, कार व अन्य वाहने गेली वाहून

Last Updated : Jul 12, 2021, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.