ETV Bharat / state

पत्नीला व्हॉटसअ‌ॅपवर मॅसेज करणाऱ्या स्केटिंग प्रशिक्षकाचा खून - व्हॉटस ऍपवर मॅसेज करणाऱ्या स्केटिंग प्रशिक्षकाचा खून

बुधवारी सकाळी मारुंजीत स्केटिंग प्रशिक्षक नाईक यांचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, हा खून मृत निलेशच्या मित्रानेच केल्याचे उघड झाले आहे. मृत निलेश आणि आरोपी विठ्ठल हे दोघे मित्र होते. दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते.

pune crime news
पत्नीला व्हॉटस ऍपवर मॅसेज करणाऱ्या स्केटिंग प्रशिक्षकाचा खून
author img

By

Published : Dec 6, 2019, 8:44 PM IST

पुणे - पत्नीला व्हॉटसअ‌ॅपवर मॅसेज पाठवत असल्याच्या कारणावरून स्केटींग प्रशिक्षकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवडीच्या मारुंजी भागात घडली आहे. निलेश शिवाजी नाईक (वय २४) असे खून झालेल्या स्केटिंग प्रशिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून मृत निलेश हा आरोपीच्या पत्नीला व्हॉटसअ‌ॅपवर मॅसेज पाठवत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

pune crime
आरोपी विठ्ठल मानमोडे

हेही वाचा - पतीकडून पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार, अनैतिक संबंधातून खून केल्याचा संशय

विठ्ठल मानमोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कपिल भूपाल नाईक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मारुंजीत स्केटिंग प्रशिक्षक नाईक यांचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, हा खून मृत निलेशच्या मित्रानेच केल्याचे उघड झाले आहे. मृत निलेश आणि आरोपी विठ्ठल हे दोघे मित्र होते. दोघे ही एकाच परिसरात राहत असल्याने दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. मानमोडे याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि इतर एक गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - संतापजनक.. नवविवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; पती,सासूला अटक

निलेश हा आरोपी विठ्ठल याच्या पत्नीला व्हॉटसअ‌ॅपवर मॅसेज करत होता. हे आरोपीला समजल्यामुळे त्याने निलेशला रात्री उशिरा मारुंजी परिसरात नेऊन दारू पाजली आणि शुद्ध हरपताच निलेशच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्यात वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी विठ्ठलने तेथून पोबारा करत नवी मुंबई गाठली. हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच आरोपी हा नवी मुंबई येथे असल्याची खात्री झाली. सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिझे यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता निलेश आपल्या पत्नीला व्हॉटसअ‌ॅपवर मसेज करत असल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

हेही वाचा - ३ वर्षाच्या मुलामुळे उघड झाले आईच्या मृत्यूचे रहस्य

दरम्यान, निलेश याने आरोपीच्या पत्नीला काय मॅसेज केले आहेत, हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी महिलेची बदनामी होऊ नये यासाठी मॅसेज सांगण्यास नकार दिला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे करत आहेत.

Intro:mh_pun_04_av_murder_ditect_mhc10002Body:mh_pun_04_av_murder_ditect_mhc10002

Anchor:- स्केटिंग प्रशिक्षकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवडीच्या मांरुजी परिसरास उघडकीस आली होती. याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. मयत निलेश शिवाजी नाईक हा आरोपीच्या पत्नीला व्हाट्सऍपवर मॅसेज पाठवत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपी ने दिली आहे.

विठ्ठल मानमोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निलेश शिवाजी नाईक वय-२४ असे खून झालेल्या स्केटिंग प्रशिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी कपिल भूपाल नाईक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मारुंजीत स्केटिंग प्रशिक्षक नाईक यांचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, मित्रानेच खून केल्याचं उघड झाले आहे. मयत निलेश शिवाजी नाईक आणि आरोपी विठ्ठल मानमोडे हे दोघे मित्र होते. दोघे ही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या घरी येऊन जाऊन होते. मानमोडे याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि इतर एक गुन्हा दाखल आहे. मयत निलेश हे आरोपी विठ्ठल याच्या पत्नीला व्हॉटसऍपवर मॅसेज करत होते. हे आरोपी ला समजलं होतं. त्यामुळे त्याने निलेश ला त्या रात्री उशिरा मारुंजी परिसरात नेऊन दारू प्यायला घातली. आणि शुद्ध हरवताच निलेश याच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्यात वार करून खून केला.

त्यानंतर आरोपी विठ्ठल ने पोबारा करत नवी मुंबई गाठली. हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच आरोपी हा नवी मुंबई येथे असल्याची खात्री झाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनीरुद्ध गिझे यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता निलेश हे पत्नीला व्हाट्सऍप मसेज करत असल्याने खून केल्याची कबुली आरोपी विठ्ठल ने दिली आहे. निलेश यांनी आरोपीच्या पत्नीला काय मॅसेज केले आहेत हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी महिलेची बदनामी होऊ नये यासाठी मॅसेज सांगण्यास नकार दिला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.