ETV Bharat / state

आधार सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार... - Mayor Muralidhar Mohol

डॉ. कोटनीस रुग्णालयातील कर्मचारी आणि मनपा आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. 100 हून अधिक कर्मचारी विविध विभागात काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे काम महत्त्वाचे आहे.

Municipal Corporation health workers
Municipal Corporation health workers
author img

By

Published : May 8, 2020, 8:38 PM IST

पुणे - आधार सोशल फाऊंडेशनच्या वतीने डॉ. कोटनीस रुग्णालयात मनपा आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. 100हून अधिक कर्मचारी विविध विभागात काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करुन त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम आधार फाऊंडेशनने केले आहे.

आधार सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार...

हेही वाचा- बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग

डॉक्टर, रुग्णवाहिका वाहन चालक, रुग्ण वाहिका सेवक, कीटक प्रतिबंधात्मक विभाग सेवक, परिचरिका, सफाई सेविका, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उप महापौर सरस्वती शेडगे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. तसचे मनपा तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास दिला. कार्यक्रमाला उपस्थित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.