पुणे: सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवारी) दुपारी वेताळ टेकडीला भेट देऊन टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राकाँचे 40 आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुळे यांना विचारले असता हे आमदार कश्याबाबत नाराज आहे, हे मला माहीत नाही. मी जयंत पाटील आणि शरद पवार सातत्याने आमदार-खासदारांशी बोलत आहोत. त्यांच्याशी चर्चा करत आहोत. कोणी एकही आमदार नाराज असता तर ते आमच्या कानावर आले असते आणि आम्ही चर्चा केली असती. असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या. तसेच ट्विटरबाबत सुळे म्हणाल्या की, मी अजितदादा यांचे ट्विट पाहिलेले नाही. मी तपासून सांगते. त्याचप्रमाणे ते ४० आमदार कशाबद्दल नाराज आहेत? यांच्याशी मी बोलेल, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
वेताळ टेकडीविषयी काय म्हणाल्या सुळे? वेताळ टेकडी बाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वेताळ टेकडीवर होत असलेल्या प्रकल्पाला स्थानिक नागरिक तसेच पुणेकरांचा विरोध आहे. इथली झाडे तोडली जाऊ नये. तसेच इथे रस्ता होऊ नये अशी पुणेकरांची इच्छा आहे. स्थानिकांचा एवढा विरोध होत आहे तर प्रशासनाने शांतपणे बसून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे यावेळी सुळे यांनी म्हटले आहे.
आम्ही राष्ट्रवादीतच राहू: आपल्याबद्दल सर्वच गैरसमज निर्माण केले जात आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. आपण राष्ट्रवादीतच आहोत. राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सर्व आमदार राष्ट्रवादीतच आहोत आणि पक्षातच राहू काम करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.
भाजप प्रवेशाबाबत तथ्य नाही: माझ्या बाबत ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही. कुठल्याही प्रकारच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत. वेगवेगल्या पक्षाचे नेते त्याबाबत भाष्य करतात त्यात काहीही तथ्य नाही. सर्व जण मला कामानिमित्त भेटत असतात तसे भेटत आहेत. या तुमच्या ज्या बातम्या दाखवल्या जातात. त्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होतो. या मध्ये काही तथ्य नाही आहे हे मी सांगू इच्छितो. अवकाळी पाऊस, बेरोजगारी, गारपीठ,७५ हजार कामगार भर्ती अजून होत नाही. कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत भेटत नाही आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद आहेत. तुमचे काय चालले आहे. माझ्या देवगिरी निवास थानाबाहेर कॅमेरे लावले जातात. माझी आग्रहाची विनंती आहे. तुम्हीच संभ्रम निर्माण करत आहात असे पवार म्हणाले.