ETV Bharat / state

खासदार सुप्रिया सुळे ठरल्या संसद विशिष्टरत्न, चेन्नई येथील संस्थेकडून संसद महारत्न पुरस्कार प्रदान

author img

By

Published : Aug 8, 2022, 12:15 PM IST

गत सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फौंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खासदार सुप्रिया सुळे ठरल्या संसद विशिष्टरत्न

बारामती (पुणे) – सर्वोत्कृष्ट संसदिय कामकाजासाठी चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार फौंडेशनचे के. श्रीनिवासन आणि प्रियदर्शिनी राहूल यांच्या हस्ते खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सन्मान आहे, अशा शब्दात खा. सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार - चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेतील खासदार सुळे यांची उपस्थिती, चर्चेतील सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके यासाठी सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला असून यंदा त्यांना संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले.

१५२ चर्चासत्रांत सहभाग - गत सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फौंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न आणि संसद विशिष्टरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१० खासगी विधेयके सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी चालू अधिवेधनात आता पर्यंत म्हणजे २९ जुलै २०२२ पर्यंत ९३ टक्के उपस्थिती लावत १८७ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण ४५६ प्रश्न त्यांनी विचारले असून १० खासगी विधेयके मांडली आहेत.

मतदारांचे आभार - बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सलग तिसऱ्यांदा मला लोकसभेत पाठविले. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत असते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील व महाराष्ट्रातील प्रत्येकाचा आहे. या सर्वांचे मनापासून आभार. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. याबद्दल पक्षाचे तसेच माझ्या संसदीय कामकाजात माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, संसदेतील स्टाफ आदी सर्वांचे मनापासून आभार. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम करीत राहणार असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.