ETV Bharat / state

MP Gajanan Kirtikar : माझ्यावर अन्याय झाला, तोंड दाबून बुक्यांचा मार खात होतो- गजानन किर्तीकर

खासदार गजानन किर्तीकर (Shiv Sena leader and MP Gajanan Kirtikar) यांना राऊत यांच्या वाढदिवसाविषयी विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना तीन वेळा शुभेच्छा साठी फोन केले. पण त्यांनी फोन उचलले नाहीत, आता मेसेज करतो. असे यावेळी किर्तीकर (MP Gajanan Kirtikar in Pune) म्हणाले.

MP Gajanan Kirtikar
गजानन किर्तीकर
author img

By

Published : Nov 18, 2022, 9:19 AM IST

पुणे : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील लोकांकडून राऊत यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. शिवसेनेचे माजी नेते तसेच सध्या शिंदे घटना सामील झालेले खासदार गजानन किर्तीकर (Shiv Sena leader and MP Gajanan Kirtikar) यांनादेखील राऊत यांच्या वाढदिवसाविषयी विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना तीन वेळा शुभेच्छांसाठी फोन केले. पण त्यांनी फोन उचलले नाहीत, आता मेसेज करतो, असे यावेळी किर्तीकर (MP Gajanan Kirtikar in Pune) म्हणाले.

स्वागत आणि सत्कार : शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांचा पुणे येथे युवा सेनेच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आले. हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्व विचारांना पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड येथील कीर्तिकर यांच्या निवासस्थानी युवा सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत (Gajanan Kirtikar felicitated by Yuva Sena in Pune) होते.

प्रतिक्रिया देताना गजानन किर्तीकर

शिवसेना कमकुवत : यावेळी किर्तीकर म्हणाले की, मी आता 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो आहे. माझे जाण्याचे कारण मी सांगितले आहे. राष्ट्रवादी बरोबर प्रवास आपल्याला येणाऱ्या काळात धोकादायक ठरणार आहे. याच कारणामुळे आम्ही शिवसेना सोडली आहे. मुख्यमंत्री आमचे होते, महाराष्ट्रातील आमच्या इतर आमदार आणि पदाधिकारी यांना कोणीही जुमानत नव्हते. याच्या उलट राष्ट्रवादीला सगळी ताकद मिळत होती. त्यांना सगळे मिळत होते. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आम्हाला कळत होते. हा आवाज आम्ही उद्धव साहेबाना सांगत होतो. शिंदे गेल्यानंतर आम्हा खासदारची बैठक घेतली. त्यावेळेस आम्ही सांगितले होते, राष्ट्रवादी सोबतची साथ सोडा, काँग्रेसचे काही होत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना कमकुवत होत आहे. असे देखील यावेळी किर्तीकर (MP Gajanan Kirtikar in Pune) म्हणाले.

संघटना बळकट : शिंदे यांची संघटना बळकट करण्याचे काम मी करतो, असे शिंदे यांनी सांगितले बाकी काही स्वार्थ नाही. बाकी आयुष्य मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत घालवणार आहे. मी शिवसेनेसाठी भरपूर काम केले आहे. या संघटनेबद्दल प्रेम आपुलकीने काम केले आहे. माझे पुणे क्षेत्रातील अर्ध राहिलेले काम आता शिंदे गटात मी करणार आहे. असे देखील यावेळी किर्तीकर यांनी सांगितले.

तोंड दाबून बुक्यांचा मार : पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गट वाढवण्याचे काम करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात माझे काम काढून घेऊन एका सिने अभिनेत्याला काम करण्याची संधी दिली. काँग्रेसमधील प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभा दिली. त्याऐवजी चंद्रकांत खैरे यांना द्यायला पाहिजे होती. माझ्यावर अन्याय झाला आहे. तोंड दाबून बुक्यांचा मार खात होतो. मी निष्ठावंत होतो म्हणून मी बंड केले आहे. काँग्रेस महाराष्ट्रातून संपत चालली आहे. त्यांना पण जीवदान देण्याचे काम केले आहे. असे देखील यावेळी किर्तीकर म्हणाले.

युवा सेनेचा पदाधिकारी : अमोल कीर्तिकर माझा मुलगा युवा सेनेचा पदाधिकारी आहे. तो निष्ठावंत आहे. स्वार्थी विचार त्याच्या मनात नाही. माझी इच्छा एकनाथ शिंदे सोबत जाण्याची आहे असे म्हटल्यावर तो म्हटला उद्धव, आदित्य संकटात आहे. पण मी म्हटले, एकनाथ शिंदे बाळासाहेबाची शिवसेना विचार पटले म्हणून मी जातो. बोलून आम्ही दोघे वेगळे झालो आहे. सगळे आम्ही एकत्रित करतो. त्यांनी अनुभव घेऊन त्यांना ठरवू दे तो काय करणार आहे, असे देखील यावेळी किर्तीकर यांनी आपला मुलगा अमोल किर्तीकर बाबत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.