पुणे : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो ( Bharat Jodo Yatra ) यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद ( Strong reaction in political circles ) उमटायला सुरुवात झाली आहे. आज पुण्यात देखील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्यावतीने पुण्यातील सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापाशी आंदोलन ( Protest near statue of freedom fighter Savarkar ) करण्यात आले यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारण्यात आले.
स्वतंत्रवीर सावरकर यांचा अपमान : काँग्रेस पक्षाकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जात आहे. कालही भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वतंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेपेक्षा सावरकर यांच्यावरील पुस्तके वाचावी. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील पत्त्यावर त्यांना पेन्शन पाठवणार आहोत. तसेच त्यांनी जे विधान केलेले आहे. त्याचा निषेध आज आम्ही व्यक्त करत आहोत असं यावेळी अंध आंदोलकांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी : सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.