ETV Bharat / state

PMPL Bus : ग्रामीण भागातील पीएमपीचे 40 हून अधिक मार्ग टप्प्याटप्प्याने बंद होणार

author img

By

Published : Nov 10, 2022, 1:07 PM IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील 40 मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला ( PMPL Passengers in Problem ) आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

PMP bus
पीएमपी बस

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील 40 मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला ( PMPL Passengers in Problem ) आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण आणि जागेची असलेली अडचण लक्षात घेता पुण्यामध्ये काम करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अनेक लोक येतात. त्यांना येजा करण्यासाठी ही महत्वाची व्यवस्था आहे ते म्हणजे पीएमपीएल बस. आता त्या बस ग्रामीण भागांमधून बंद करण्याचा निर्णय पीएमपीएलने घेतलेला आहे.

पीएमपी तोट्यात : पुणे आणि पिंपरी चिंचवडहद्दीत पीएमपीकडून 1290 बस चालवण्यात येतात. शहराबाहेर पीएमपीचे 104 मार्ग सुरू आहेत. दररोज दहा ते बारा लाख प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. शहरातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता ही सेवा अपूरी पडत असल्याची ओरड अनेक दिवसांपासून आहे. तसेच ग्रामीण भागात पीएमपी तोट्यात चालली ( PMP at loss ) होती. हे देखील या मार्गावरील पीएमपी सेवा बंद करण्याचे मुख्य कारण आहे.

ग्रामीण भागात एसटी सुरू करण्याची विनंती : त्यामुळे पीएमपीच्या विद्यमान अध्यक्ष ओमप्रकाश बकेरिया यांनी एसटी महामंडळाला पत्र पाठवून पीएमपीच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या मार्गांवर एसटी सेवा सुरू करण्याची विनंती केली ( Request to start ST in rural areas ) आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पीएमपीच्या हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

टप्प्याटप्प्याने सेवा बंद करावी : ग्रामीण भागात एसटीची सेवा देण्यासंदर्भात माझे एसटीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. त्यांची सेवा सुरळीत झाल्यावर टप्प्याटप्प्याने आम्ही पीएमपीची ग्रामीण भागातील सेवा बंद करणार आहोत. पीएमपी प्रशासनाने सध्या तरी ग्रामीण मार्गावरील बस सेवा तात्काळ बंद न करता टप्प्याटप्प्याने बंद करावी अशी सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.