ETV Bharat / state

मोगऱ्याच्या सुवासिक फुलांचा दगडूशेठ गणपतीला अभिषेक - Mogara mahotsav

सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही पुष्परचना केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये २०० किलो मोगरा, ११०० चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, टगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडो फुले वापरण्यात आली. तसेच श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

मोगरा महोत्सव
author img

By

Published : May 1, 2021, 8:03 PM IST

पुणे - शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप, चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेतले.

आकर्षक सजावट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी ही पुष्परचना केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये २०० किलो मोगरा, ११०० चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, टगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडो फुले वापरण्यात आली. तसेच श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

मंदिर बंद पण दैनंदिन धार्मिक विधी सुरू

मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरू आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील, अशी माहिती यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

24 तास ऑनलाइन दर्शनाची सोय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाइट, अ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.