ETV Bharat / state

बारामतीत खंडणी मागणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

बारामती हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागणार्‍या टोळी विरुद्ध बारामतीत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीने बारामती शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

टोळीवर कारवाई
टोळीवर कारवाई
author img

By

Published : Apr 20, 2021, 6:32 PM IST

बारामती - हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागणार्‍या टोळी विरुद्ध बारामतीत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीने बारामती शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे. नितिन बाळासो तांबे (रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे), अमिन दिलावर इनामदार (रा.कसबा बारामती जि.पुणे), गणेश संजय बोडरे (रा.बारामती ता. बारामती जि. पुणे) व अनोळखी २ इसम यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी
आरोपी
फिर्यादी हे बारामती शहरातील फलटण रोडवरील त्यांच्या स्नेहा गार्डन या हॉटेलवर असताना आरोपी हॉटेलमध्ये आले. नितीन तांबे हा फिर्यादीस म्हणाला की 'मी एन टी भाई आहे. तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबंध आहेत. तुला हॉटेल नीट चालवायचे असेल तर दर महिन्याला माझा माणूस येईल. त्याच्याकडे २५ हजार रूपये दे. नाहीतर मी स्वत: येईन' असे म्हणून दमदाटी केली.
आरोपी अमिन इनामदार व त्याचे इतर साथीदार फिर्यादीस म्हणाले की, 'एन.टी.भाईचे संबध लांबपर्यंत आहेत. तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केलास, तर आम्ही जेलमध्ये बसू व जेल मधून तुझा गेम करू' अशी धमकी दिली. आरोपींनी हॉटेलमधील दारूच्या बाटल्या जबरदस्तीने घेऊन तेथेच पिण्यास सुरूवात केली. आरोपींपैकी एका अनोळखी इसमाने फिर्यादी जवळ येत म्हणाला की, 'तुला असाच त्रास होईल. तू शहाणा हो. एन.टी.भाईला त्याने सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला पंचवीस हजार रुपये हप्ता दे. नाहीतर तुला असाच त्रास कायम त्रास होईल.
आरोपी नितीन तांबे फिर्यादीस म्हणाला की 'तुला लय माज आलाय, मी आताच मोक्का तोडून जेलमधून बाहेर आलो आहे. त्याने फिर्यादीस मारले. खिशातून चाकू काढून हप्ता दिला नाही. हॉटेलबाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडू' अशी धमकी दिली. आरोपी अमीन इनामदार याने धातूचे कडे हातात घेवून फिर्यादीच्या पोटात मारले. साक्षीदार हे सोडवण्यास येत असताना आरोपींनी फिर्यादीस धक्काबुक्की केली आणि हॉटेलच्या काऊंटरमधील ७ हजार २०० रूपये रोख रक्कम, हॉटेलचे लायसन्स आणि घडयाळ ही काढून घेतले.

यांनी केली कारवाई.......

आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार वरील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण हे करीत आहेत. सदरची कारवाई ही डॉ.अभिनव देशमुख,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग बारामती,नारायणशिरगावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती विभाग बारामती, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार अविनाश दराडे,अतुल जाधव,अंकुश दळवी यांनी केली.

१८ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई....

सदर कारवाई बद्दल पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून १८ गुन्हेगारी टोळयांविरूध्द १८ मोक्कांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये १२० आरोपी अटक केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.