पुणे - मागील दोन वर्षांपासून रखडलेले सिहंगड रस्त्याचे काम तातडीने सुरू करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज (दि. 12 सप्टें.) किरकटवाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले होते. आजपर्यंत सिहंगड रस्त्यावरील या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थितीती या ठिकाणी निर्माण झाली आहे. सतत पाठपुरावा करुनही या रस्त्याचे काम अद्याप सुरू नसल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते यांनी सांगितले. जर तत्काळ या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा यावेळी मनसैनिकांनी यावेळी दिला. यावेळी मनसैनिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त अभियंता वैशाली भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.
या रस्त्याचे काम 31 मार्च, 2021 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आश्वासन यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त अभियंता वैशाली भुजबळ यांनी दिला आहे.
हेही वाचा - राज्यात रेडी रेकनरच्या दरात 1.74 टक्के वाढ, नवे दर उद्यापासून होणार लागू