ETV Bharat / state

आमदार राहूल कुल यांची गरजूंना मदत, 6 हजार कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप

author img

By

Published : Apr 26, 2020, 8:53 AM IST

सध्या दौंड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या गरजूंना मदत केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ६ हजारहून अधिक कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतक्या किराणा सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे. या कीटमध्ये ५ किलो तांदूळ, १ किलो साखर, २०० ग्रॅम चहापावडर, १ किलो मीठ, दीड किलो तूरडाळ, १ मसाला पॅकेट, १ किलो तेल, साबण अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

आमदार राहूल कुल यांची गरजूंना मदत
आमदार राहूल कुल यांची गरजूंना मदत

पुणे - देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशात दौंड तालुक्याचे आमदार राहूल कुल यांच्या पुढाकारातून सुमारे ६ हजार अन्नधान्य कीटचे वितरण करण्यात आले आहे . यामुळे, लॉकडाऊनच्या काळात हातवार पोट असलेल्या कुटुंबाना आधार मिळाला आहे .

कोरोनाचा सामना करत असताना संचारबंदीमुळे रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत आहेत. त्यांच्यासमोर प्रपंच चालवायचा कसा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शिधापत्रिका धारकांना धान्याचे वाटप होत असले, तरीही अनेक कुटुंबांना रेशनिंग किंवा इतर कुठल्याही प्रकारे मदत मिळत नाही. अशा गरजू नागरिकांना आमदार राहूल कुल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

विविध उद्योग, सेवाभावी संस्था व अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने सध्या दौंड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या गरजूंना मदत केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ६ हजारहून अधिक कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतक्या किराणा सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे. या कीटमध्ये ५ किलो तांदूळ, १ किलो साखर, २०० ग्रॅम चहापावडर, १ किलो मीठ, दीड किलो तूरडाळ, १ मसाला पॅकेट, १ किलो तेल, साबण अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा व यवत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस अधिकारी व कर्मचारी असे अनेकजण जीवाची पर्वा न करता तालुक्याच्या सेवेसाठी झटत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे या हेतूने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप यापूर्वी आमदार कुेल यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.