ETV Bharat / state

'सावकारी कर्जमाफी योजना तर आमच्या सरकारच्या काळातील ' - मनसे

राज ठाकरे यांच्या व्यापक हिंदुत्वाच्या भूमिकेचे भाजपने स्वागतच केले आहे. मात्र, जोपर्यंत परप्रांतीयांबाबत त्यांची भूमिका बदलत नाही तोपर्यंत मनसेला सोबत घेण्याचा विषयच नसल्याचे ही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

आमदार चंद्रकांत पाटील
आमदार चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 9, 2020, 10:59 PM IST

Updated : Mar 9, 2020, 11:23 PM IST

पुणे - राज्य सरकारने शेतकऱ्यांची सावकारी कर्जे माफ केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, हा निर्णय आमच्या सरकारच्या काळातच घेतला गेला होता. काही तांत्रिक बाबींमुळे तो राहिला होता. या सरकारने ही तांत्रिक बाब दूर केली एवढेच आहे, असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

बोलताना आमदार चंद्रकांत पाटील

पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. नोंदणीकृत सावकारीपेक्षा खासगी सावकाराची समस्या मोठी आहे. सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र या प्रश्नांवर मार्ग काढला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटीमध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणूक हा विषय नव्हता. ते दोघे मित्र आहेत. त्यामुळे ते भेटले असे स्पष्ट करत, राज ठाकरे यांच्या व्यापक हिंदूत्वाच्या भूमिकेचे भाजपने स्वागतच केले आहे. मात्र, जोपर्यंत परप्रांतीयांबाबत त्यांची भूमिका बदलत नाही तोपर्यंत मनसेला सोबत घेण्याचा विषयच नसल्याचे ही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा - तुम्हीच मुख्यमंत्री आहात, चंद्रकांत पाटलांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

Last Updated : Mar 9, 2020, 11:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.