ETV Bharat / state

संतापजनक..! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खून करून सावत्र बाप फरार - pune crime news

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी परिसरात सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीची मोठी बहीण शाळेत तर आई कामावर गेल्याचा फायदा घेत हा अत्याचार करण्यात आला आहे.

minor-girl-physical-abused-by-father-in-pune
पुण्यात सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून केला खून
author img

By

Published : Dec 13, 2019, 1:35 PM IST

पुणे- येथील पिंपरी-चिंचवडमध्ये दापोडी परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी सावत्र बाप फरार असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत. ही घटना काल (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास घडली असून रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

पुण्यात सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून केला खून

हेही वाचा- निर्भयाच्या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्या, आई आशा देवींची सर्वोच्च न्यायालय आणि केंद्राकडे मागणी

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी परिसरात सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीची मोठी बहीण शाळेत तर आई कामावर गेल्याचा फायदा घेत हा अत्याचार करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनतर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. घटनेनंतर नराधम बाप फरार झाला असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.

दरम्यान, शाळेतून मोठी बहीण घरी आली तेव्हा घराच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. थोडा वेळ थांबून मोठ्या बहिणीने कुलूप तोडले. त्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलिसांनी तीन पथक आरोपीच्या शोधात रवाना केली आहेत. आरोपी हा रिक्षा चालक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पीडित मुलीच्या कुटुंबासोबत राहात होता. त्यांच्यात वाद देखील झाले होते, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.

Intro:mh_pun_02_rape_avb_mhc10002Body:mh_pun_02_rape_avb_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये दापोडी परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावत्र बाप फरार असून त्याचा शोध भोसरी पोलीस करत आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळ च्या सुमारास घडली असून रात्री साडेआठ च्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी परिसरात सावत्र बापाने आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोठी बहीण शाळेत तर आई कामावर गेली असताना तिच्या एकट्या पणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. दरम्यान, त्यांनतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. घटने नंतर नराधम बाप फरार झाला असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.

दरम्यान, शाळेतून मोठी बहीण घरी आली तेव्हा घराच्या दरवाजा कुलूप लावलेले होते. थोडा वेळ थांबून मोठ्या बहिणीने कुलूप तोडले. त्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलिसांनी तीन पथक आरोपीच्या शोधत रवाना केली आहेत. आरोपी हा रिक्षा चालक आहे गेल्या दोन महिन्यांपासून तो पीडित मुलीच्या कुटुंबासोबत राहात होता. त्यांच्यात वाद देखील झाले होते अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.

बाईट:- शंकर अवताडे- वरिष्ठ पोलीस निरीक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.