पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ( minor girl gang raped ) एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहीक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहाजणांना चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (minor girl gang raped in pune ) याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल ( six people detained ) केला आहे. ही घटना जुलै ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. ( Gang rape of a minor girl)
सहा जणांना घेतले ताब्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपीपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यासॊबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर तिचे फोटो काढून ते वायरल करण्याची धमकी देत इतर आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती अल्पवयीन मुलीने घरी दिल्यानंतर घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चतुर्श्रुंगी पोलिसांनी तात्काळ गुन्हा ( Pune Crime News ) दाखल करून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई घडला सामूहिक बलात्काराचा असा प्रकार : मध्य मुंबईतील लोअर परेल भागात एका 16 वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape Mumbai ) केल्याचा आरोप पोलिसांनी शनिवारी केला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Gangrape accused arrested) केली असून शुक्रवारी रात्री चाळीत झालेल्या हल्ल्यात सहभागी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये मुलीच्या बॉयफ्रेंडसह (girl gangraped by her boyfriend ) अन्य सहा मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पालघमध्येही अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे पॅनेलच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या मित्रासह आरोपींनी समुद्रकिनारी नेण्यापूर्वी समुद्रकिनारी असलेल्या एका मोकळ्या बंगल्यात तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. रविवारी पहाटे आठ आरोपींनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) 376 (डी) (सामूहिक बलात्कार), 366 (अ) (अल्पवयीन मुलीची खरेदी), 341 (चुकीचा प्रतिबंध) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. 342 (चुकीने बंदिस्त करणे) आणि 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याचे कलम, ते म्हणाले.
ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार : गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.