ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar : वनरक्षक परीक्षा रद्द होणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

पुण्यात आज जीएसटीवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. वनरक्षक परीक्षेत झालेल्या कॉपीबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, परीक्षेच्याबाबतीत कोणतीही अडचण नाही. पेपरच फुटला नसल्याने, परीक्षा रद्द होणार नाही, असे स्पष्ठ मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

Minister Sudhir Mungantiwar
मंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Aug 5, 2023, 10:03 PM IST

माहिती देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : वनरक्षक परीक्षेत झालेल्या कॉपीबाबत राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, संभाजीनगर येथे आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने जर कोणी फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कायद्याने ठेचले पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांनी देखील सावध राहणे गरजेचे आहे. आपण कोणावर विश्वास ठेवतो हे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवला पाहिजे.

देशाची अर्थव्यवस्था : पुण्यात आज जीएसटीवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आपला देश वेगाने आर्थिक व्यवस्थेकडे प्रगती करत आहे. 2010-11 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. पण आता 5 व्या क्रमांकावर आली आहे. लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकवर येणार आहोत. यात सीए यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. असे यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

त्या भीती पोटी ते एकत्र येत आहेत : कोल्हापूर येथे जवळपास 13 विरोधी पक्षांची बैठक आहे आणि या बैठकीत स्वाभिमानी पक्ष देखील असणार आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले की, कोणीही आमच्या सोबत नाही तसेच राजू शेट्टी देखील आमच्या सोबत नाही. आम्ही एकत्र आलो आहेत त्या भीती पोटी ते एकत्र येत आहेत. कोण एकत्र येत आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचे नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

तुम्ही क्लीन चीट का दिली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तो आरोप नेमका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर की, अजित पवार यांच्यावर होता. याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांच्यावर तो आरोप होता. तर त्या झाडाची शाखाच स्वतंत्र बाहेर पडली असल्याने, त्यांच्यावर आरोप कसले आले. ते आमच्यात आले म्हणून आता विरोधकांची पोट दुखायला लागली आहे. मग तुम्ही त्यांना का क्लीन चीट दिली होती. सुरुवातीला जेव्हा आम्ही आरोप केला होता. तेव्हा तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही का क्लीन चीट दिली. याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देणार का? आता पोट दुखून उपयोग काय आहे. आता त्यांना प्रश्न विचारायला कंठ फुटत आहे, तेव्हा का कंठ फुटत नव्हता असे देखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

हे डरपोक लोक आहेत : किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले की, शेकडो केसेसच्या चौकश्या या राज्यात दरोरोज होत आहे.आपल्या इथे कायद्यात काय नेता वेगळा आहे की, गावातील माणूस वेगळा आहे.असे कोठे संविधानात लिहिले आहे का? नेता म्हणजे गुन्ह्याचा संरक्षण कवच नव्हे. तुमच्यावर जर काही आरोप झाले तर त्याची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. ही चौकशी याआधी अनेक नेत्यांवर झाली आहे. तेव्हा डोळ्यात पाणी का आले नाही हे डरपोक लोक आहे. यांना भीती आहे की, यांचे बींग फुटले तर काय होईल अश्या शब्दात मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिबट सफारी बाबत मुनगंटीवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट सफारी प्रकल्प निर्माण करत आहे. त्यासाठी 80 कोटी रुपये खर्च करणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. लवकरच काम सुरू होणार आहे.अस ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Mungantiwar Reaction : नितीन देसाई यांचे जाणे मनाला चटका लावून जाणारी घटना - सुधीर मुनगंटीवार
  2. Sudhir Mungantiwar : 'माझ्याही गाडीचे कुणीतरी नटबोल्ट काढले होते, घातपाताचा प्रयत्न पण...'
  3. Sudhir Mungantiwar On Kirit Somaiya : संधी आहे, संधीचे सोन करा!; किरीट सोमैया प्रकरणी मुनगंटीवार यांचा अनिल परब यांना सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.