ETV Bharat / state

समाजात विष पेरून दंगे घडवाणार्‍यांपासुन सावध रहा - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - minister dattatraya bharne on amaravati violence

काही पक्षाची मंडळी मतासांठी जाती धर्माचे दंगे काढुन सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करतात. अशा जातीयवादी पक्षाला जाब विचारून समाजात दंगे घडविणार्‍यांपासुन जनतेने वेळीच सावध व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले जनतेला केले. (minister dattatraya bharne in indapur) जनतेने आपल्याला घरी बसवलेले आहे, हे काही लोकांना अजुन कळतच नाही, असा टोला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता पाटील यांना लगावला. (minister dattatraya bharne criticize harshwardhan patil)

dattatraya bharne
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
author img

By

Published : Nov 20, 2021, 7:58 PM IST

Updated : Nov 20, 2021, 8:10 PM IST

बारामती (पुणे) - काही मंडळी, काही पक्ष हे समाजामध्ये जाती जातीचे, धर्माचे विष पेरतात आणि मुस्लिम बांधवावरती खोटे आरोप करुन ठपका ठेवतानाच मतांसाठी राजकारण करतात. मात्र, इंदापूर तालुक्यात आपण हिंदु-मुस्लिम भेदभाव मानत नाही. सर्वजण एकमेकांवर बंधुभावाप्रमाणे प्रेम करतो. काही पक्षाची मंडळी मतासांठी जाती धर्माचे दंगे काढुन सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करतात. अशा जातीयवादी पक्षाला जाब विचारून समाजात दंगे घडविणार्‍यांपासुन जनतेने वेळीच सावध व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले जनतेला केले. ते इंदापूर येथे बोलत होते. (minister dattatraya bharne in indapur)

इंदापूर येथील कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

..राज्यातील पहिला मंत्री

मंत्री म्हणुन काम करताना लोकांना सहकार्य करण्याची भावना मनामध्ये असते. मात्र, विरोधकांकडुन नेहमीच त्रास दिला जातो. कोरोनाच्या काळात पहिल्या लाटेमध्ये कोरोना संसर्गाची मोठी भिती होती. माणूस शेजारच्या माणसाकडे जात नव्हता. मात्र, मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. सोलापूर जिल्हा रुग्णालयात कीट घालुन रूग्णांची विचारपुस करून तेथील शौचालय, प्रसाधनगृहे स्वच्छ आहे का? याची पाहणी करणारा सोलापूर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री व राज्यातील पहिला मंत्री असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले.

हेही वाचा - 'मी दुबई ला चाललोय, सरकारी यंत्रणेने माझ्यावर लक्ष ठेवावे!'

हर्षवर्धन पाटलांना नाव न घेता टोला -

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षात ११५० कोटी रूपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन आणला आहे. पाठीमागच्या १९-२० वर्षापुर्वींची इंदापूर तालुक्याची स्थिती काय होती? आणि मागच्या तीन चार वर्षातील परिस्थिती कशी आहे? याचा सुज्ञ जनतेने व जानकारांनी विचार करावा. मात्र, काही मंडळी संबध नसताना येऊन उदघाटनाचा प्रयत्न करतात. त्यांना उदघाटन करायचा अधिकारही नसतो. जनतेने आपल्याला घरी बसवलेले आहे, हे काही लोकांना अजुन कळतच नाही, असा टोला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता पाटील यांना लगावला. (minister dattatraya bharne criticize harshwardhan patil)

मंत्रीपद हे शोभेसाठी नाही -

मंत्रीपद हे केवळ शोभेसाठी नाही. मंत्रीपदाची खुर्ची ही काटेरी आहे. तिचा वापर जपुन करणारा मी मंत्री असल्याने विरोधकांनी वाटेत कितीही काचा, खिळे आडवे टाकले तरी त्या काचा व खिळे बाजुला करुन चालण्याची सवय झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करायला संधीच मिळत नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मतासांठी फिरण्याची वेळच आली नाही. इंदापूर तालुक्यातील मतदारांच्या आशिर्वादरूपी मतांमुळेच मी आज इथे उभा आहे. राजकारण बाजुला ठेऊन इंदापूर शहराच्या विकिसासाठी मी भरीव निधी टाकला आहे. त्या निधीतुनच इंदापूर शहरात सर्व कामे चालु असुन चालु कामात फुकटचे श्रेय घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे भरणे म्हणाले.

Last Updated : Nov 20, 2021, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.