ETV Bharat / state

खेड तालुक्यातील आव्हाट गावावरील डोंगराला पडल्या भेगा; माळीण गावाची पुनरावृत्ती होण्याची भिती - khed

आव्हाट गावातील डोंगरावर भूस्‍खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार सुचित्रा आमले यांनी तेथील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर आमले यांनी या भागाचा पंचनामा करण्याचे तलाठी (सर्कल) यांना आदेश दिले. याबाबतचा अहवाल भू-संशोधन विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर त्यांच्याकडून या भागाची पाहणी केली जाणार आहे.

खेड तालुक्यातील आव्हाट गावावरील डोंगराला पडल्या भेगा
author img

By

Published : Aug 8, 2019, 4:21 AM IST

पुणे- गेल्या वीस दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. मात्र, खेड तालुक्यातील आव्हाटमधील दरेवस्ती येथे डोंगरावरील जमिनीला मोठ्या आणि खोल भेगा पडून जमीन खचू लागली आहे. त्यामुळे येथील वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.

आव्हाट गावातील डोंगरावर भूस्‍खलन होण्याची परिस्थिती

आव्हाट गावातील डोंगरावर भूस्‍खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार सुचित्रा आमले यांनी तेथील माहिती घेतली. त्यानंतर आमले यांनी या भागाचा पंचनामा करण्याचे तलाठी (सर्कल) यांना आदेश दिले. याबाबतचा अहवाल भू-संशोधन विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर त्यांच्याकडून या भागाची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान या भागात पाऊस कायम असून डोंगरावरील जमिनीच्या भेगा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तात्काळ उपयोजना करण्याची स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.

एक होते माळीण.....

पाच वर्षापूर्वी अशाच पद्धतीने माळीण गावावरील डोंगरावर भेगा पडल्या होत्या. त्यावेळी नागरिकांनी तक्रार करुनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी संपूर्ण गाव गाड झोपेत असताना डोंगराचा कडा गावावर कोसळला व मातीच्या ढिगाऱ्याखाली हे गाव गाडल्या गेले.

Intro:Anc__गेल्या वीस दिवसांपासुन उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असुन अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहे मात्र आता खेड तालुक्यातील आव्हाट मधील दरेवस्ती येथे
डोंगरावरील जमिनीला मोठ्या आणि खोल पर्यंत भेगा पडुन जमीन खचू लागली आहे. त्यामुळे येथील वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे

आव्हाट गावातील डोंगरावर भूस्‍खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार सुचित्रा आमले यांना परिस्थितीची माहिती घेऊन या भागाचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठी सर्कल यांना दिले आहेत. हा अहवाल भु-संशोधन विभागातील अधिका-यांकडे पाठवल्यानंतर या भागाचे भूसंशोधन विभागाकडून पाहणी केली जाणार आहे.

डोंगरावरील जमिनीच्या भेगा दिवसेंदिवस येथील डोंगरावरील जमिनीच्या भेगा वाढत असून पावसाचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तत्काळ उपयोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे

एक होतं माळीण.....

पाच वर्षापुर्वी अशाच पद्धतीने माळीण गावावरील डोंगरावर भेगा पडल्या होत्या त्यावेळी नागरिकांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते आणि संपुर्ण गाव गाड झोपेत असताना डोंगराचा कडा गावावर कोसळुन गाव मातीच्या डिगा-याखाली गाडले गेले..Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.