पुणे : Manoj Jarange Patil Sabha : मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे लढणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या विविध भागात सभा घेत आहेत. आरक्षणासाठी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिल्यानंतर जरांगे पाटील राज्याचा दौरा करत आहेत. शुक्रवारी त्यांची पुण्यातील राजगुरुनगरमध्ये सभा झाली. या सभेतून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
बोलू द्या, अन्याथा आत्महत्या : मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू असताना एका तरुणानं मंचावर येऊन जरांगे यांच्याकडून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. मला बोलू द्या, अन्याथा 'मी' आत्महत्या करेल, अशी धमकी तरुणानं दिल्यानं सभेत एकच गोंधळ उडाला. मराठा समाजाला तत्काळ कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सरकारला 40 दिवसांची मुदत दिल्यानंतर राज्यातील अनेक शहरांमध्ये जरांगे पाटील सभा घेत आहेत.
मंचावर काहीकाळ गोंधळ : राजगुरुनगरमध्ये झालेल्या सभेत जरांगे बोलत असताना, एका तरुणानं जोरदार गोंधळ घातला. तरुणानं अचानक स्टेजवर येऊन जरांगे यांच्याकडून माईक घेऊन 'मला बोलू द्या', अशी मागणी केली. बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्यानं दिली. त्यामुळं मंचावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. जरांगे भाषण संपवून स्टेजवर उभे असताना एक तरुण मंचावर आला. जरांगे यांनी या संतप्त तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तोही जरांगेंच्या पाया पडला. मात्र, तो ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला उचलून स्टेजवरून खाली नेलं.
मराठा आरक्षणावरुन सरकारवर हल्लाबोल : या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारवर हल्लाबोल केला. सरकारनं आमचीच माणसं आमच्या अंगावर सोडलीय. मात्र, आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. हे शांततेचं युद्ध मराठ्यांना न्याय देईल, असं देखील जरांगे म्हणाले.
हेही वाचा -
- Manoj Jarange Patil Sabha : विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण पारित करा; मनोज जरांगेंची मागणी
- Manoj Jarange Patil Sabha Today : मनोज जरांगे पाटील यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा; लाखो मराठे एकवटणार, पहा ग्राउंड रिपोर्ट
- Maratha Reservation Suicide: मुंबईत सणवार येत राहतील पण...मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची मुंबईत आत्महत्या